संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त)

रामराज्य रथयात्रा आज रत्नागिरीत
रत्नागिरी : विश्व हिंदू परिषद आयोजित रामराज्य रथयात्रा गुरुवारी (ता. ३) रत्नागिरीत येत आहे. भगवान श्री राम दिग्विजय यात्रेचे आगमन व दर्शन सोहळा मारुती मंदिर सर्कल येथे उद्या सायंकाळी ६.३० वाजता येणार आहे. या वेळी रत्नागिरीकरांनी यात्रेच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.


खेडमध्ये १५ हजार ५०४ मुलांचे लसीकरण
खेड ः तालुक्यात लहान मुलांच्या लसी
करणास प्रारंभ झाल्यापासून १५ ते १८ वयोगटातील १५ हजार ५०४ मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वयोगटातील ६ हजार ६७८ मुलांचे लसीकरण झाले. नगर पालिका हद्दीत २ हजार ६९६, तळे विभागात ११२१, कोरेगाव १३१९, फुरूस २७९४, आंबवली २२५९, वावे ५६९, लोटे १४४०, शिवबुद्रुक २५१६, तिसंगी ७४९ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ४१ मुलांचे लसीकरण झाले. १२ ते १४ वयोगटात नगर पालिका हद्दीत ११९२, तळे विभागात ४६९, कोरेगाव ४५३, फुरूस ८९४, आंबवली ११५०, वावे ४५६, लोटे ६३९, शिवबुद्रुक ९८७, तिसंगी ३६४ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ७४ मुलांचे लसीकरण झाले.

गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेत
संत रोहिदास नगर प्रथम

खेड ः शहरातील कुवारसाई येथील त्रिमूर्ती मित्रमंडळ व दापोली तालुक्यातील जालगांव येथील राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्यागडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेत शिवतर रोड येथील संत रोहिदास नगर मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला विविध मंडळे तसेच वैयक्तिक स्वरूपातून उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेसाठी उत्तमोत्तम किल्ल्यांचे सादरीकरण करण्यात आल्याने स्पर्धेची
रंगत वाढली. गुजर आळीतील नवजीवन बालमित्रमंडळाने द्वितीय, ब्राह्मणआळीतील अनुष्का जोशी हिने तृतीय तर कुवारसाई येथील जाणता राजा मित्रमंडळाने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. विजेत्यास २ हजार २२२ रु., उपविजेत्यास १ हजार ५५५ रु., तृतीय क्रमांकास १ हजार १११ रु. व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी त्रिमूर्ती मित्रमंडळचे पदाधिकारी उपस्थित होते.


शिवतर पंचक्रोशीत पुरेशा दाबाने वीज मिळणार
खेड ः तालुक्यातील शिवतर पंचक्रोशीला सातत्याने भेडसावणारा कमी दाबाच्या विजेसह खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. पंचक्रोशीसाठी ३३/१८ के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. शिवतर पंचक्रोशीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र पंचक्रोशीला सातत्याने कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न सतावत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजेअभावी यांत्रिक उपकरणे ठप्प होऊन दुकान व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नुकतीच शिवतर पंचक्रोशीसाठी ३३/१८ के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

फोटो नाही
-rat२p१०.jpg
खेड ः आंबवली रस्त्यावर पडलेले खड्डे.

आंबवली रस्त्यावर खड्डेच खड्डे
खेड ः तालुक्यातील खेड आंबवली मार्गापुरता खड्ड्यात गेला असून, या मार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे; मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरते दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्याकडे लक्ष देण्याची मागणी येथील यंत्रणेकडे युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. खेड-आंबवली मार्गवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. यामुळे वाहने हाकताना चालकांना कसरत करावी लागत आहे. भरणे ते सुकीवली सोनारवाडी इथंपर्यंत रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला आहे. अपघाचा धोकादेखील वाढला आहे. या रस्त्यावरील खड्डे मे महिन्यात बुजवण्यात आले होते; मात्र हे खड्डे पावसाळ्यात पुन्हा उखडले गेले आहेत. यामुळे हे खड्डे पुन्हा बुजवण्याची मागणी सागवेकर यांनी केली आहे.


५९९४४
-rat२p१२.jpg ः

प्रियदर्शनी पतसंस्था बिनविरोध
लांजा ः सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाला सार्थ ठरलेल्या लांजा शहरातील प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते; परंतु संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत संस्थेची बिनविरोध निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या निवडणुकीमध्ये अश्रफ रखांगी, मंगेश चव्हाण, मिलिंद लांजेकर, दिनेश पटेल, संजय तेंडुलकर, दानिश मुजावर, सोहेल मापारी, नाजीम नेवरेकर हे सर्व सर्वसाधारण गटातून बिनविरोध झाले आहेत. तर सुफिया रखांगी, धनिता चव्हाण महिला राखीव मतदार संघातून, योगेश वाघधरे नागरिकांचा मागास प्रवर्ग, कमल कांबळे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून तर विजय हटकर भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. प्रियदर्शनी पतसंस्थेची निवडणूक या वेळी होणार अशी अटकळ बांधली जात असतानाच संस्थेचे संस्थापक महंमद रखांगी यांच्या विशेष प्रयत्नाने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.