राजापूर-खासदार, आमदारांमुळे राजापूरचा विकास रखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-खासदार, आमदारांमुळे राजापूरचा विकास रखडला
राजापूर-खासदार, आमदारांमुळे राजापूरचा विकास रखडला

राजापूर-खासदार, आमदारांमुळे राजापूरचा विकास रखडला

sakal_logo
By

खासदार, आमदारांमुळे राजापूरचा विकास रखडला
अभिजित गुरव यांचा आरोप ; आगामी निवडणुकीत जागा दाखवा
राजापूर, ता. २ ः ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांचा अभाव, वाढती बेरोजगारी, तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या सर्व समस्यांना शिवसेनेचे आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे. तालुक्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना आगामी निवडणुकीत जागा दाखवून दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील अपुर्‍या सेवा सुविधांबाबत सर्वपक्षियांनी एकत्रित येत घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे; पण याला जबाबदार कोण? याचाही शोध घेतला पाहिजे. गेली तीन टर्म राजापूरवासीयांनी ज्यांना निवडून दिले ते शिवसेना आमदार राजन साळवी नेमके काय करतायत, असा खडा सवालही गुरव यांनी उपस्थित केला. कधी सुपर स्पेशालिस्ट रुणालय मंजूर झाल्याचे जाहीर करायचे, कधी उपजिल्हा रुग्णालय होणार, कधी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भरणार, मंत्र्यांची भेट, निवेदन दिले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करायचे हेच काम आहे काय. प्रत्यक्षात कृती काय आणि किती आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या हे कधी सांगणार? किती बेरोजगारांना रोजगार दिलात? आज ग्रामीण भागातील रस्त्यांची काय दुरवस्था आहे? लोकांनी तुम्हाला निवडून कशासाठी दिले आहे, याचा विचार करणार आहात की नाही असा प्रश्‍न गुरव यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांना तर मतदार संघाचे काहीच देणं घेणे नाही असे त्यांचे वर्तन आहे. केंद्रात जनतेचे प्रतिनिधित्व करताना किती विकासनिधी आणला, किती योजना राबवल्या हे एकदा त्यांनी सांगावे. पक्षप्रमुखांपुढे पुढे पुढे करत राहायचे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा टोला गुरव यांनी लगावला.

चौकट
तीनवेळा निवडून येऊनही अडगळीत
निष्ठावान म्हणून आपली पाठ थोपटून घेणार्‍या आमदार साळवींनी आपली ही निष्ठा मतदारांशीही आहे हे कामातून दाखवून द्यावे कारण, मातोश्रीला तुम्ही किती निष्ठावान आहात हे माहित आहे. नाहीतर त्यांनी तीन टर्म निवडून आलेल्या आमदाराला सत्तेत येऊनही असे अडगळीत फेकले नसते, असा टोलाही गुरव यांनी लगावला.