राजापूर-वास्तव क्रिएशनच्या कलाकारांना सिनेमात संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-वास्तव क्रिएशनच्या कलाकारांना सिनेमात संधी
राजापूर-वास्तव क्रिएशनच्या कलाकारांना सिनेमात संधी

राजापूर-वास्तव क्रिएशनच्या कलाकारांना सिनेमात संधी

sakal_logo
By

rat2p15.jpgः
59947
राजापूर ः वास्तव क्रिएशनच्यावतीने आयोजित नवरंग फॅन्सी ड्रेस व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांसह अभिनेता भूषण कडू.
-------
वास्तव क्रिएशनच्या कलाकारांना सिनेमात संधी
भूषण कडू ; फॅन्सी ड्रेस, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
राजापूर, ता. २ः कोकणातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या वास्तव क्रिएशन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात या टीममधील कलाकारांना सिनेमामध्ये अभिनय करण्याची संधी देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता भूषण कडू यांनी दिली. या वेळी वास्तव क्रिएशनच्या वतीने नवरंग फॅन्सी ड्रेस व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन कडू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कलाकारांसाठी काम करणार्‍या वास्तव क्रिएशन टीमतर्फे कलाकारांचा गुणगौरव, मार्गदर्शन तसेच नवरंग फॅन्सी ड्रेस स्पर्धा व रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत झालेल्या कार्यकमाला जुईली शेलार, अमोल भातडे, समीर कुळे, कृष्णा यद्रे, गराटे, अनिल गलगली, बाबू नाईक, अरिफ खान, रत्नाकर शेट्टी, शाहीर प्रीती भोवड, शाहीर प्रफुल्ल पुजारी आदी उपस्थित होते. वास्तव क्रिएशनची बालकलाकार ऋतुजा शिनगारे हिने बहारदार लावणी सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. वास्तव क्रिएशनतर्फे घेण्यात आलेल्या निसर्गरम्य कोकण माझं, नवरंग फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील प्रथम तृप्ती पाठारे (सांताक्रुझ), द्वितीय मोहिनी चौधरी (ठाणे), तृतीय कुजंल सौंदळकर (भाईंदर) तसेच रांगोळी स्पर्धेतील मोठा गट प्रथम विलास रहाटे (रत्नागिरी), मयुरी पातरे (नागपूर), छोटा गट प्रथम अक्षय वहाळकर (रत्नागिरी), आरती पांचाळ (नेरूळ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. अभिनेता भूषण कडू यांनी भरत जाधव, नाना पाटेकर यांची मिमिक्री करत उपस्थितांचे मनोरंजन केले.