बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार
बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार

बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार

sakal_logo
By

बाबू घाडीगांवकर यांना पुरस्कार
गावतळे, ता. २ः कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि दापोली येथील उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना काव्यप्रेमी शिक्षक मंच या संस्थेचा सन २०२२ या वर्षासाठीचा ‘काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार’ सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या घाडीगांवकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या ए. डी. जोशी सभागृहात काव्यप्रेमी शिक्षकमंच या संस्थेचा १२वा राज्यस्तरीय काव्योत्सव सोहळा मोठ्या दिमाखात झाला. त्यांचा ''बाबा'' हा कवितासंग्रह तर ''वणवा'' हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून त्यांना साहित्यक्षेत्रातील विविध संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.