शहरातील रस्त्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील रस्त्यांची दुरवस्था
शहरातील रस्त्यांची दुरवस्था

शहरातील रस्त्यांची दुरवस्था

sakal_logo
By

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat२p१७.jpg

(खेड ः खेड-दापोली रस्त्यावरील तळ्याचे वाकण येथे पडलेला मोठा खड्डा)
----------------
खेड शहरातील रस्त्यांची दुरवस्था

खेड, ता. २ ः खेड नगरपालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या खेड-दापोली रस्त्यावरील तळ्याचे वाकण येथे पडलेला मोठा खड्डा अपघातांना आमंत्रण देणारा आहे; मात्र नगरपालिका प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे. या जीवघेण्या खड्ड्यात आदळून एखाद्याचा बळी गेला की नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
खेड नगरपालिका हद्दीतील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी न केल्याने नगरपालिका हद्दीतील काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस थांबताच नगरपालिका प्रशासनाने हे खड्डे बुजवणे गरजेचे होते; मात्र प्रशासनाने तशी कोणतीच कार्यवाही न केल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.
खेड शहरातील तळ्याचे वाकण येथे रस्त्यात पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात हेच कळेनासे झाले आहे. तळ्याचे वाकण येथून १०० मीटरवर असलेल्या जिजामाता उद्यानासमोर असाच एक मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात आदळून आतापर्यंत दुचाकी किंवा रिक्षासारखी अनेक वाहने नादुरुस्त झाली आहेत. मात्र हा खड्डादेखील बुजवला जात नाही. खेड-दापोली मार्गावर खेड-भरणेदरम्यान देखील ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महाडनाका, अण्णांचा पऱ्या या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ लागले आहेत.