जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश
जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश

sakal_logo
By

जिल्ह्यात १७ पर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी, ता. २ : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून उद्यापासून (ता. ३) १७ पर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षांतील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करून एकमेकांना लक्ष करत आहेत. त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
--
रक्तदात्या तरुणांची कार्यतत्परता
ओटवणे ः गोवा-मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सावंतवाडी येथील गोविंद केसरकर यांना ‘एबी पॉझिटिव्ह’ या रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचे लक्ष वेधताच त्यांनी पर्वरी येथे कामानिमित्त असलेले अमोल प्रभुखानोलकर व कळंगुट येथे असलेले वैभव पेडणेकर यांच्याशी त्वरित संपर्क साधला. त्यानंतर या दोन्ही रक्तदात्यांनी तत्काळ मणिपाल रुग्णालयाच्या रक्तपेढीत जात रक्तदान केले. यासाठी महेंद्र अ‍ॅकॅडमीचे महेंद्र पेडणेकर यांचेही सहकार्य लाभले. या दोन्ही युवा रक्तदात्यांसह महेंद्र पेडणेकर, तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचे केसरकर कुटुंबीयांनी आभार मानले.