चिपळुणात पकडला दारूने भरलेला कंटेनर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात पकडला दारूने भरलेला कंटेनर
चिपळुणात पकडला दारूने भरलेला कंटेनर

चिपळुणात पकडला दारूने भरलेला कंटेनर

sakal_logo
By

ratchl२१.jpg
59877
चिपळूणः पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूने भरलेला कंटेनर जप्त केला.
----------
चिपळुणात पकडला
दारूने भरलेला कंटेनर
८९१ बॉक्स जप्त, ३५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
चिपळूण, ता. २ ः गोव्याहून नाशिककडे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला चिपळुणात पकडले. चिपळूण पोलिसांनी ३१ ऑक्टोबरला रात्री पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई केली. १० लाखाचा कंटेनर आणि २५ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीच्या दारूचे ८९१ बॉक्स, असा ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळबंस्ते येथे ही कारवाई झाली आहे.
गेल्या काही वर्षापासून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सातत्याने सुरू आहे. उप्तादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिसांनीही त्यावर कारवाई केल्या आहेत; मात्र तरीही गोवा बनावटीची वाहतूक नित्यनेमाने सुरू राहिली. शहरात व तालुक्यातील विविध भागात गोवा बनावटीची दारू राजरोसपणे विकली जाते. गोव्याहून नाशिककडे कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. गाडीचा नंबरही पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेखनाका ते कळबंस्तेदरम्यान सापळा रचण्यात आला. सोमवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास कळंबस्ते येथे कंटेनर आला असता पोलिसांनी तो रोखला. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे, पोलिस हेडकॉंन्स्टेबल पप्या चव्हाण यांच्यासह सात ते आठ पोलिसांनी ही कारवाई केली. कंटेनरचालक बाबासाहेब सुखदेव बुदवंत (४४, मुळशी, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंटेनरमध्ये १९८ बिअर (टुबर्ग) ४८ व्हीस्कीचे बॉक्स, आयबी असे एकूण ८९१ गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. बाबासाहेब बुदवंत हा चालक असून तोच कंटेनरचा मालकदेखील आहे. १० लाखाचा कंटेनर आणि २५ लाखाची गोवा बनावटीची दारू अशी एकूण ३४ लाख ४५ हजार ७२ रुपयाची कारवाई करण्यात आली.