रिफायनरीविरोधी आंदोलकांवर तडीपारीची टांगती तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिफायनरीविरोधी आंदोलकांवर तडीपारीची टांगती तलवार
रिफायनरीविरोधी आंदोलकांवर तडीपारीची टांगती तलवार

रिफायनरीविरोधी आंदोलकांवर तडीपारीची टांगती तलवार

sakal_logo
By

रिफायनरीविरोधी आंदोलकांवर
तडीपारीची टांगती तलवार
५ प्रमुख नेत्यांना नोटिसा; प्रकल्पाच्या घोषणेची तयारी सुरू
राजापूर, ता. २ः मागील काही महिन्यात राज्यातून ४ मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता राज्य सरकार कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार पुढील आठवड्यात या प्रकल्पाची घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार्‍या आंदोलकांच्या ५ प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याद्वारे रिफायनरीविरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडीपार का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससह अन्य एक प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडताना विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली तर, सोशल माध्यामांवर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात सूर उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.त्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे राज्य शासन पुढील आठवड्यात रिफायनरीबाबतचा मोठा सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास प्रकल्प विरोधकांकडून तीव्र होणारा विरोध लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांचे नेतृत्व करणार्‍या पाच नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटिशीद्वारे संबंधितांना तडीपार का करू नये, अशी विचारणा करण्यात आली असून त्याबाबतचे आपले म्हणणे सादर करण्याची मुदतही देण्यात आली आहे. पोलिसांच्या या नोटिशीला संबंधित आंदोलक नेते कोणते उत्तर देणार याकडे साऱ्यांचे आता लक्ष लागले आहे.