पान एक-आंबोलीत भर वस्तीत घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-आंबोलीत भर वस्तीत घरफोडी
पान एक-आंबोलीत भर वस्तीत घरफोडी

पान एक-आंबोलीत भर वस्तीत घरफोडी

sakal_logo
By

पान एक (सुधारीत)
60018
60016
60013

टीपः swt235.jpg मध्ये फोटो आहे.
आंबोली ः उचकटलेली कडी.
टीपः swt236.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - आंबोली ः चोरट्यांनी फोडलेले कपाट.
टीपः swt237.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - आंबोली ः घटनास्थळी पाहणी करताना पोलिस अधिकारी.

आंबोलीत भरवस्तीत घरफोडी
६९ रोकड पळविली; कामतवाडीत घडलेल्या प्रकाराने खळबळ
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २ ः येथे भर वस्तीत बंद घर फोडल्याचा प्रकार आज उघड झाला. सुमारे ६९ हजारांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली. जिल्ह्यात गेले काही दिवस चोरीचा सिलसिला बंद होता. आता पुन्हा असे प्रकार डोके वर काढू लागल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आज उघड झालेला प्रकार कामतवाडी येथे घडला.
तेथील शिक्षण विभागात केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत रामा गावडे यांचे बंद घर चोरट्याने फोडले. याबाबतची तक्रार दाखल करून घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. श्री. गावडे पूर्ण कुटुंबासह पुणे येथे देव दर्शनासाठी गेले होते. आज ते घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी मागच्या बाजूने छपराची रीप कापून घरात उतरले. तेथील खोलीची कडू उचकटून त्यांनी आत प्रवेश केला. तेथील दोन कपाटे त्यांनी फोडली. त्यातील एका कपाटातील रोकड पळविली केली. एक कपाट मजबूत असल्याने त्यांना ते फोडता आले नाही. त्याचा फक्त हँण्डल तोडला. दुसरे एक कपाट मजबूत असल्याने त्यांना ते फोडता आले नाही. चोरीच्या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक शंकर कोरे, उपअधीक्षक रोहिणी सोळुंके, उपनिरीक्षक पाटील, महेश निरवडेकर, दीपक शिंदे, राजेश नाईक, पोलिसपाटील विद्या चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी अंगणात कुत्र्यांना मटण भात खायला घातल्याचे दिसून आले. घटनास्थळी श्वान व ठसेतज्ज्ञ पथक दाखल झाले होते. श्वान रेम्बोकडून या चोरीचा तपास सुरू होता. दरम्यान, तो हायवेजवळ जाऊन घुटमळला. याबाबत श्री. गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्स अडकली
कपाटात सोन्याच्या बांगड्या होत्या. चोरट्यांनी त्या एका पर्समध्ये घातल्या. मात्र, ते पुन्हा छपरावर चढून जात असताना ती पर्स खाली पडली आणि दिवाणाच्या बाजूला असलेले कोपऱ्यात अडकली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे दागिने असलेली ही पर्स चोरट्यांना नेता आली नाही.