चिपळूण- चिपळूणात दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण- चिपळूणात दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात
चिपळूण- चिपळूणात दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

चिपळूण- चिपळूणात दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

sakal_logo
By

६०००५

rat२p१८.jpg प्रशांत धोत्रे


दुय्यम निबंधकासह सहायक
‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
चिपळूणमध्ये कारवाई; सात हजार लाच घेताना पकडले
चिपळूण, ता. २ ः चिपळूणात दुय्यम निबंधक आणि त्याचा खासगी सहायक लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचे नाव प्रशांत रघुनाथ धोत्रे व त्याच्या वतीने लाच घेण्यात सहभागी याचे नाव अरविंद बबन पडवेकर असे आहे. धोत्रे १८ ऑक्टोबरला चिपळूणात रुजू झाले झाले होते. मुंबई येथून ते चिपळुणात आले होते.
शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नव्याने हजर झालेल्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तेथील दुय्यम निबंधक अधिकारी प्रशांत धोत्रे व त्याच्या वतीने हजर अरविंद बबन पडवेकर यांना ७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या पक्षकाराचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणीसाठी लाच मागण्यात आल्याचे उघड झाले. यातील दुय्यम निबंधक (श्रेणी १) प्रशांत रघुनाथ धोत्रे (४३, मूळ रा. नातूनगर ता. खेड) व खासगी व्यक्ती अरविंद बबन पडवेकर (५६, रा. मुरादपूर चिपळूण) यांना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचे खरेदीखत व हक्कसोड नोंदणी करण्यासाठी प्रशांत धोत्रे या अधिकाऱ्याने १० हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २ नोहेंबरला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे खरेदीखत व हक्कसोड कामाचा मोबदला म्हणून ४५०० रुपये व यापूर्वीच्या कामाची रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तडजोडीअंती दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे याच्या वतीने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अरविंद पडवेकर यास ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कावळे, संतोष कोळेकर, दीपक आंबेकर, हेमंत पवार आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. प्रशांत धोत्रे १८ ऑक्टोबर रोजी मुंबई येथून चिपळुणात रुजू झाले होते.