धान्य वितरण समस्येबाबत निलेश राणेंनी केली चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य वितरण समस्येबाबत
निलेश राणेंनी केली चर्चा
धान्य वितरण समस्येबाबत निलेश राणेंनी केली चर्चा

धान्य वितरण समस्येबाबत निलेश राणेंनी केली चर्चा

sakal_logo
By

धान्य वितरण समस्येबाबत
निलेश राणेंनी केली चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. 3 ः सर्व्हर डाऊन असल्याने रेशन धान्य वितरण करण्यात मागील ऑक्टोबरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली. महिना संपला तरी अनेक ग्राहकांना धान्य मिळाले नाही. याबाबत ग्राहकांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. राणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व्हर डाऊन ही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना रेशन मिळाले नाही. तरी सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होऊ नये याचा विचार करून मागील महिन्यात ज्यांना धान्य मिळाले नाही, त्यांना या महिन्यात मागील महिन्याचे धान्य ऑनलाइन पद्धतीने मिळावे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका राणे यांनी मांडली. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली.