ऑफलाईन धान्य वितरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफलाईन धान्य वितरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
ऑफलाईन धान्य वितरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ऑफलाईन धान्य वितरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

sakal_logo
By

swt३८.jpg
६००८०
शेखर गावडे

ऑफलाईन धान्य वितरणाची
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः धान्य दुकानावरील रेग्युलर व मोफत धान्य ऑफलाईन वितरीत करण्यास परवानगी द्या, अशी मागणी नेरूर सरपंच शेखर गावडे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ''गेले ८ ते १० दिवस सर्व्हर प्राब्लेम सुरु असुन ई-पॉस मशीन चालत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे थंम्ब लागत नाहीत. ते लागल्याशिवाय धान्य वितरीत करता येत नाही. सध्या भात कापणी सुरु असून शेतकऱ्यांना तासन तास धान्य दुकानावर धान्य घेण्यासाठी थांबावे लागत आहे. जेष्ठ नागरीक, शेतकरी ग्रामस्थ तसेच इतर ठिकाणी बाहेरगावी कामासाठी जाणारे ग्रामस्थ हे सकाळी ७ वाजल्यापासून धान्य दुकानावर येऊन थांबून राहतात. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांबरोबर वाद निर्माण होत आहेत. तरी सर्वर एररमुळे गावातील बरेच ग्रामस्थांना धान्य वितरीत करावयाचे शिल्लक आहे. आनंदाचा शिधा हा ऑफलाईन वितरीत करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे रेग्युलर व मोफत धान्य सुध्दा ऑफलाईन वितरीत करण्यास परवानगी मिळण्यास तसेच ऑक्टोबर महिन्याचे धान्य वितरीत करण्यास मुदतवाढ मिळण्यास विनंती आहे, अशी मागणी गावडे यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.