देवगड फिशरमेन्स संस्था अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड फिशरमेन्स संस्था अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे
देवगड फिशरमेन्स संस्था अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे

देवगड फिशरमेन्स संस्था अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे

sakal_logo
By

swt३४.jpg
६००७६
देवगडः येथे नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले.

देवगड फिशरमेन्स संस्था
अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः येथील देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटी या मच्छीमारी संस्थेची २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे तर उपाध्यक्षपदी उमेश आंबेरकर यांची निवड झाली. संस्थेच्या कार्यालयामध्ये अध्यासी अधिकारी पी. एल. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रीया झाली.
येथील देवगड फिशरमेन्स को -ऑप सोसायटी या मच्छीमारी संस्थेची निवडणूक प्रक्रीया बिनविरोध झाली. आज संस्थेच्या कार्यालयामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी झाल्या. या निवडीवेळी संस्थेचे सभासद जगन्नाथ दत्तात्रय कोयंडे, दत्ताराम विनायक कोयंडे, सज्जाउद्दीन सोलकर, संस्थेचे प्रभारी सचिव विवेक सुर्वे, सहाय्यक सचिव उमेश कदम उपस्थित होते. नुतन कार्यकारिणी अशी, अध्यक्ष -द्विजकांत विठ्ठल कोयंडे, उपाध्यक्ष -उमेश पांडुरंग आंबेरकर, तर व्यवस्थापक मंडळामध्ये प्रदिप प्रकाश कोयंडे, उपेंद्र नागेश लोणे, राहुल उमाकांत मुणगेकर, उल्हास कमलाकर मणचेकर, महेश बाळकृष्ण सागवेकर, प्रियांका गुरुनाथ वाडेकर, शुभांगी सुधाकर कदम, सईद इब्राहिम सोलकर, श्रीराम पुंडलिक देवगडकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे.