युद्ध कला प्रशिक्षणाला मळेवाडमध्ये प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युद्ध कला प्रशिक्षणाला मळेवाडमध्ये प्रतिसाद
युद्ध कला प्रशिक्षणाला मळेवाडमध्ये प्रतिसाद

युद्ध कला प्रशिक्षणाला मळेवाडमध्ये प्रतिसाद

sakal_logo
By

swt39.jpg
60081
मळेवाडः युद्ध कला व स्वसंरक्षण शिबिरातील सहभागी विद्यार्थी. (छायाचित्र ः धनश्री मराठे)

युद्ध कला प्रशिक्षणाला प्रतिसाद
मळेवाड, ता. ३ ः अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. येथील ग्रामपंचायतीत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट यांच्या उपस्थित झाले. यावेळी उपसरपंच मराठे यांनी, मुलांना युद्धातील साहित्य व साधने यांची ओळख व्हावी, स्वसंरक्षण कसे करावे? याची कला आत्मसात व्हावी, यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरासाठी श्री गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समिती व पदाधिकारी यांचे आभार मानले. अभिनव फाऊंडेशन, सावंतवाडी व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.