जिल्ह्यात पाच महिन्यांत 23 जणांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पाच महिन्यांत 23 जणांची आत्महत्या
जिल्ह्यात पाच महिन्यांत 23 जणांची आत्महत्या

जिल्ह्यात पाच महिन्यांत 23 जणांची आत्महत्या

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

जिल्ह्यात पाच महिन्यांत २३ जणांची आत्महत्या

कारणे चिंता वाढवणारी ; संवाद हरवला, नैराश्यातून घटना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे पोलिसांनीही चिंता व्यक्त केली आहे. क्षुल्लक कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात २३ जणांनी आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनांमधील बहुतांशी आत्महत्यांचे कारण आजही गुलदस्त्यात आहे.
कौटुंबिक वाद, मानसिक स्वास्थ्य बिघडलेले, नोकरी नसणे यामुळे नैराश्य येऊन आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. नैराश्य, अपयश आणि संकटाचा सामना करता न आल्याने आपले जीवन संपवण्याचा विचार केला जातो. ऑक्टोबर महिन्यात एकापाठोपाठ ८ जणांनी आत्महत्या केल्या. या सर्व घटना केवळ रत्नागिरी तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.
घरातील वातावरण आनंदी आणि मैत्रीपूर्ण असणे गरजेचे आहे. एकमेकांमधील संवाद हरवल्याने तरुण नैराश्येत जातात. त्यातून टोकाचे पाऊल उचलले जात आहे. घरातील युवक, तरुणांशी संवाद ठेवला पाहिजे. त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
आतापर्यंतच्या घटनांमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. १७ जणांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत तर तिघांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नाटे येथील एका पोलिसाचा समावेश आहे तर मुलीला पती रागावले म्हणून रत्नागिरी, लांजातील दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.