दाभोळ ः शासनाने शाळा बंद केल्या तर जिल्हाभर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः शासनाने शाळा बंद केल्या तर जिल्हाभर आंदोलन
दाभोळ ः शासनाने शाळा बंद केल्या तर जिल्हाभर आंदोलन

दाभोळ ः शासनाने शाळा बंद केल्या तर जिल्हाभर आंदोलन

sakal_logo
By

शाळा बंद केल्यास
जिल्हाभर आंदोलन ः रुके
दाभोळ, ता. ३ ः २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असणार्‍या शाळा शासनाने बंद केल्या तर जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
शिक्षणासारख्या पवित्र हक्कापासून विद्यार्थ्यांना सरकारने वंचित ठेवू नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने २० पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळा बंदचा घाट घातला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगौलिक परिस्थितीचा विचार करता अतिशय डोंगराळ व दुर्गम ठिकाणी गावे वसली आहेत. या गावातील प्राथमिक शाळांचा विचार करता ५ ते ६ किमी असे अंतर प्रत्येक शाळांमध्ये आहे. शासनाच्या या विचित्र निर्णयामुळे शाळा बंद झाल्यास अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. खेड्यापाड्यातील गोरगरीब, दुर्बल घटकापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचवण्याचे कार्य यापूर्वी अनेकांनी केले आहे तसेच सुज्ञ आणि जागृत शासन, प्रशासनाने हे निर्णय ताबडतोब थांबवून शिक्षणाच्या पवित्र हक्कापासून कोणालाही वंचित ठेवू नयेत. शासनस्तरावरून या विषयाबाबत पालक आणि विद्यार्थीवर्गात निर्माण झालेली भीती दूर करावी, असेही या पत्रकात नमूद केले आहे.