राजापूर-कडाक्याच्या थंडीने आंबा हंगामाची चाहूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-कडाक्याच्या थंडीने आंबा हंगामाची चाहूल
राजापूर-कडाक्याच्या थंडीने आंबा हंगामाची चाहूल

राजापूर-कडाक्याच्या थंडीने आंबा हंगामाची चाहूल

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat3p20.jpg ःKOP22L60099 राजापूर ः आंबा कलमांवर डोकावत असलेला मोहोर.
-rat3p21.jpg,2L60100
rat3p22.jpg ःKOP22L60101व आंबा कलमाला आलेली पालवी.
-rat3p23.jpg ःKOP22L60102 कीटकनाशकांची सुरू असलेली फवारणी.
------------------

कडाक्याच्या थंडीने आंबा हंगामाची चाहूल
कलमे मोहोरली ; तुडतुडा, थ्रीप्स थोपविण्यासाठी फवारणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः लांबणीवर पडलेल्या पावसामध्ये आंबाकलमांना आलेली पालवी दिवासगणिक जून (अधिक मजूबत) होत आहे. त्याच्या जोडीने दिवसागणिक थंडी वाढत असून काही भागामध्ये कलमांना मोहोराचे फुटवे येऊन ते डोकावू लागले आहेत. त्यामुळे आंबा बागायतदार मनोमन चांगला सुखावला आहे. आगामी काही दिवसांमध्ये नेमके कसे वातावरण राहणार याकडेही बागायदार लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, तुडतुडा आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागांमध्ये सध्या कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यावर जोर दिल्याचे चित्र दिसत आहे.
कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असलेला आंबा हंगाम गतवर्षी सुरूवातीपासून प्रतिकूल हवामान आणि निसर्ग संकटाच्या दुष्टचक्रामध्ये अडकला होता. लांबणीवर पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी आवश्यक असलेली थंडी गतवर्षी उशीरा सुरू झाली होती. त्यातून, आंबा हंगाम काहीसा उशिरा सुरू झाला आहे. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी आलेल्या पालवीला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यात, थ्रीप्स आणि किडीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे मोहोरापूर्वी आलेली पालवी धोक्यात आली होती. या सार्‍या प्रतिकूल स्थितीमध्ये बहुतांश कलमांना उशिरा मोहोर आल्याने त्याचा फटका आर्थिक उलाढालींना बसला होता.
यावर्षीही ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे आंबा कलमांना पालवी फुटली होती. पावसाचा म्हणावा तितकासा पालवीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भविष्यामध्ये मोहोर येण्यास अनुकूल ठरणारी पालवी दिवसागणिक अधिक मजबूत होऊ लागली आहे. त्याच्या जोडीने गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. थ्रीप्स आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंबा बागांमध्ये सध्या किटकनाशकांची फवारणी सुरू झाली आहे.