दाभोळ-खेर्डी रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-खेर्डी रस्त्याची दुरवस्था
दाभोळ-खेर्डी रस्त्याची दुरवस्था

दाभोळ-खेर्डी रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat3p19.jpg ः KOP22L60071 खेर्डी ः रस्त्याची झालेली दूरवस्था.
-----------
दापोली-मंडणगड मार्गावरील
खेर्डी रस्त्याची दुरवस्था
दाभोळ,ता. ३ः दापोली-मंडणगड मार्गावरील खेर्डी येथील रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण येथे तक्रार करून या रस्त्यावरील खड्ड्यांची मलमपट्टी करणार्‍या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
खेर्डी गावाच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्यावर कमालीचे खड्डे पडले आहेत. खेर्डी माडी दुकानापासून खड्ड्यांची मालिका सुरू होते. अगदी करंजाणी उघडा मारुती मंदिर या मार्गावरील रस्त्यापर्यंत खड्डेच खड्डे अशी अवस्था आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून वाहनचालकांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून यापूर्वी करण्यात आली होती. खड्डे तातडीने भरण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन खड्डे भरण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला; मात्र या ठेकेदाराने खड्डे भरण्याच्या नावाखाली केवळ जुजबी मलमपट्टी करण्याचे काम केले. त्यामुळे पुन्हा या रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी दळवी यांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांकडून या रस्त्यावरील खड्डे तातडीने योग्य प्रकारे न भरल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.