वेंगुर्ले पाणी योजना टप्पा 2 चे उद्या लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले पाणी योजना टप्पा 2 चे उद्या लोकार्पण
वेंगुर्ले पाणी योजना टप्पा 2 चे उद्या लोकार्पण

वेंगुर्ले पाणी योजना टप्पा 2 चे उद्या लोकार्पण

sakal_logo
By

swt३१७.jpg
६०१३९
वेंगुर्लेः येथे पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित भाजप पदाधिकारी.

वेंगुर्ले पाणी योजना टप्पा २ चे उद्या लोकार्पण
प्रसन्ना देसाईः टंचाई दूर होणार
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ः गेली २० वर्ष वेंगुर्ले शहराला भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी टंचाई. हीच पाणी टंचाई दूर करून शहराला टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने भाजपच्या माध्यमातुन नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवकांनी सातत्याने प्रयत्न केल्याने येथील निशाण तलावाची उंची वाढवून जीर्ण पाईपलाईन सुद्धा बदलण्यात आल्या आहेत. आता शहर नळपाणी पुरवठा योजना टप्पा २, निशाण तलावाची उंची २.५ मीटरने वाढवणे या कामाचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ५ ला सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली आहे.
येथील भाजप तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी देसाई बोलत होते. त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, साईप्रसाद नाईक, बाबली वायांगणकर, रविंद्र शिरसाट, दादा केळूसकर आदी उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, ‘‘वेंगुर्ले पालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणूकित शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे वचन दिले होते आणि या वाचनाची पूर्तता झाली आहे. वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष गिरप व त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या ५ वर्षात शहरात केलेली विकासकामे असतील ही सर्व जनतेच्या समोर आहेत आणि जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या ५ वर्षाच्या कारकिर्दीत केली याचे समाधान आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून ही नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. त्यावेळी आमदार असलेले व आताचे पालकमंत्री चव्हाण यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सुद्धा मंत्रालयात याबाबत होणाऱ्या बैठकांत सहभाग घेतला होता आणि याचेच फलित म्हणून टँकरमुक्त वेंगुर्लाच्या दिशेने सध्या शहराची वाटचाल सुरू आहे.’’