चिपळूण बसस्थानकाचा ठेका 4 महिन्यापूर्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण बसस्थानकाचा ठेका 4 महिन्यापूर्वी
चिपळूण बसस्थानकाचा ठेका 4 महिन्यापूर्वी

चिपळूण बसस्थानकाचा ठेका 4 महिन्यापूर्वी

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl३२.jpg ः
६०१३८
चिपळूण ः पत्रकार परिषदेत बसस्थानकाविषयीची भूमिका मांडताना संदीप सावंत व सहकारी.
-------------------

चिपळूण बसस्थानकाचे काम सुरू करा
संदीप सावंत ; १५ दिवसात काम सुरू न झाल्यास ठेका रद्द करावा
चिपळूण, ता. ३ ः येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी १९ जुलैला निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. या कामाचा ठेका सातारा येथील ठेकेदाराला मिळाला आहे. चार महिने उलटले तरी ठेकेदाराने अद्याप कामाला सुरवात केलेली नाही. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या १५ दिवसांत ठेकेदाराने बसस्थानकाच्या कामाला सुरवात न केल्यास त्याच्या कामाचा ठेका रद्द करण्यात यावा. नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली जाईल, असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी चार-पाच वर्षांपूर्वी निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. यानंतर पोटठेकेदाराने कामाला सुरवात केली. नंतर या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले ते अजूनही जैसे थे आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदार संघ तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी या कामाला वेग मिळण्यासाठी आवाज उठवला. बसस्थानकाच्या कामासाठी श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या वेळी प्रशासनाकडून योग्य ते आश्वासन दिले होते. तरीही या कामाला वेग मिळाला नाही; परंतु काही दिवसांपूर्वीच संदीप सावंत यांनी या प्रस्थानकाच्या कामाला सुरवात न झाल्यास बसस्थानकाच्या आवारात गुरे बांधून आंदोलन करू, असा इशारा दिला होता.

दरम्यान, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता कार्यालयाने १९ जुलै २०२२ ला निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार सातारा येथील ठेकेदाराने ३ कोटी ४२ लाख ९१ हजार ५२ हजारांत ठेका घेतला. ठेका घेऊन चार महिने झाले तरी कामाला सुरवात केलेली नाही. याबाबत संदीप सावंत यांनी माहिती देताना नाराजी व्यक्त केली.

येत्या पंधरा दिवसात या ठेकेदाराने काम न केल्यास त्याच्या कामाचा ठेका रद्द करावा. नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शासनाकडे केली. तत्पूर्वी या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी आत्तापर्यंत सहकार्य केल्याबद्दल खासदार विनायक राऊत, सेनानेते भास्कर यादव, पालकमंत्री उदय सामंत, काँग्रेसचे अशोक जाधव, माजी सभापती शौकत मुकादम आदींचे आभार मानले आहेत.