चिपळुणातील रस्त्यांची आठवड्यात दुरुस्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातील रस्त्यांची आठवड्यात दुरुस्ती करा
चिपळुणातील रस्त्यांची आठवड्यात दुरुस्ती करा

चिपळुणातील रस्त्यांची आठवड्यात दुरुस्ती करा

sakal_logo
By

(पान ५ साठी)

फोटो ओळी
- ratchl३१.jpg
६०१४४

ःचिपळूण ः सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करताना काँग्रेसचे पदाधिकारी.
-----------
चिपळुणातील रस्त्यांची आठवड्यात दुरुस्ती करा

काँग्रेसच्या शिष्टमंडळ ; अधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण, ता. ३ ः गुहागर मिरजोळी बायपास रस्त्यासह ग्रामीण भागातील रस्ते तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची येत्या आठवडाभरात दुरुस्ती करावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे.
या वेळी इब्राहीम दलवाई, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. चिपळुणातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना शारीरिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. या साऱ्या प्रकाराला ठेकेदार जबाबदार आहेत; मात्र आपला या ठेकेदारांवर कोणताही वचक नाही अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. येत्या आठ दिवसात गुहागर-मिरजोळी बायपास रस्ता, ग्रामीण भागातील रस्ते व मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. या वेळी काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, सेवादल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, योग जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, साजिद सरगुरोह, यश पिसे, तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष जनार्दन पवार, मैनूदीन सय्यद, बाबा चव्हाण, रफीक शिकलगार, संजय डेरवणकर, जयराम लांबे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसे व अधिकारी उपस्थित होते.

चौकट-
एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीला नाही प्रतिसाद

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे एन्रॉन पूल खचण्याची घटना घडली. यानंतर सुरक्षतेच्यादृष्टीने हा पूल बंद ठेवण्यात आला आहे; मात्र अजूनही या पुलाची दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सातत्याने झाल्यानंतर पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झाला. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी या पुलाच्या कामासाठी चार वेळा निविदाप्रक्रिया राबवूनदेखील प्रतिसाद मिळालेला नाही, असे स्पष्ट केले. यावरून या पुलाच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.