खेडमध्ये 20 हजारांची चहापत्ती जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमध्ये 20 हजारांची चहापत्ती जप्त
खेडमध्ये 20 हजारांची चहापत्ती जप्त

खेडमध्ये 20 हजारांची चहापत्ती जप्त

sakal_logo
By

(पान 3 साठी)

खेडमध्ये २० हजारांची चहापत्ती जप्त

खेड, ता. 3 ः अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांनी खेडमधील विष्णू महादेव पाटणे अॅण्ड सन्स या घाऊक दुकानावर धाड टाकली. या धाडीत प्रशासनाने २० हजारांची चहापत्ती जप्त केली.
जून २०२२ मध्ये याच दुकानातून चहाचा एक नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या नमुन्याबाबत आलेल्या अहवालात अनसेफ म्हणजेच घातक/असुरक्षित असे निष्पन्न झाले होते. यानंतर २९ ऑक्टोबरला प्रशासनाने धाड टाकत एकूण २० हजारांची चहापत्ती जप्त केल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त कोकण विभाग सुरेश देशमुख, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नसुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे, विजय पाचुपते यांच्यावतीने करण्यात आली आहे.