मारहाणप्रकरणी आचरा पोलिसांत दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणप्रकरणी आचरा पोलिसांत दोघांवर गुन्हा
मारहाणप्रकरणी आचरा पोलिसांत दोघांवर गुन्हा

मारहाणप्रकरणी आचरा पोलिसांत दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी आचरा
पोलिसांत दोघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ३ ः ओवळीये-जंगमवाडी (ता.मालवण) येथे दयानंद कमलाकर जंगम (वय ३२) यांना पूर्व रागातून शिवीगाळ करुन
चिव्याचे (बांबुचे) दांड्याने मारहाण करुन जखमी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांवर आचरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१) रात्री घडली. याबाबतची फिर्याद दयानंद कमलाकर जंगम यांनी आचरा पोलिसात दिली. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः दयानंद जंगम (वय ३२) यांना पूर्व रागातून कैलास सत्यवान जंगम (वय २७) व सत्यवान रामचंद्र जंगम (वय ५५ दोन्ही रा. ओवळीये-जंगमवाडी) यांनी शिवीगाळ करत चिव्याचे (बांबुचे) दांड्याने उजवे पायाच्या मांडीवर मारुन दुखापत करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारणी फिर्याद दाखल झाल्यानंतर मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकारणी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आचरा पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय धेंडे करत आहेत.