फूड इन्स्पेक्टर'' सांगून हॉटेल व्यवसायिकाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फूड इन्स्पेक्टर'' सांगून हॉटेल व्यवसायिकाला गंडा
फूड इन्स्पेक्टर'' सांगून हॉटेल व्यवसायिकाला गंडा

फूड इन्स्पेक्टर'' सांगून हॉटेल व्यवसायिकाला गंडा

sakal_logo
By

फूड इन्स्पेक्टर सांगून हॉटेल व्यवसायिकाला गंडा
कणकवलीतील प्रकार ः ३२ हजाराची लूट
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ः ‘फूड इन्स्पेक्टर बोलतोय. तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तात्काळ तुम्हाला वॉरंट बजावला जाईल’, असे सांगून तब्बल ३२ हजार रुपये भरणा करून घेतल्याचा प्रकार आज उघडकीस आला. शहरातील तिरफळ हॉटेल मालक विशाल लोके यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाईन गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील पटवर्धन चौकालगत विशाल लोके यांचे तिरफळ हॉटेल आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईवर नारायण सादने या नावाने आपण ओरोस जिल्हा मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन फुड इन्स्पेक्टर बोलतो, असा फोन आला. समोरील व्यक्ती म्हणाली, ''तुमच्या हॉटेलमध्ये फूड इन्स्पेक्टर असलेल्या सुरेखा वानखडे आणि त्यांच्या मुलीने जेवण केले. त्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांची कंप्लेट आमच्याकडे आली आहे. तुमच्या हॉटेलमध्ये टॉयलेट नाही, पाणी स्वच्छ नाही, कामगार नीट नाहीत. त्यामुळे तुमच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तुम्हाला समन्स बजावण्यात आला आहे. तुम्हाला हॉटेल बंद करावे लागेल. मालवणी भाषाही त्यांना येत होती. यामुळे घाबरलेल्या लोके यांनी त्यांना अनेक विनवण्या केल्या. पण, तुम्हाला काही वेळत समन्स पाठवला जाईल, असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या लोके यांनी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी तात्काळ पैसे भरा, असे त्यांना सांगितले. तसेच एका बँकेचा नंबरही दिला. त्या नंबरवर लोक यांनी दोन टप्प्यात १६ हजार ८२० असे ३३ हजार ६४० रुपये भरणा केले. त्यानंतर ते साडेबाराच्या सुमारे कणकवली पोहोचले. मात्र, त्यांनी हॉटेलमध्ये न जाता शहरातील हॉटेल व्यवसायिकांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. त्याचवेळी आपण फसलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या हॉटेललगत नगरपंचायतीच्या ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यामुळे कणकवली नगरपंचायतकडून असे काही घडले असेल, असा संशय आला. त्यामुळे लोके यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली. त्यांनाही झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतोष काकडे आणि शहरातील हॉटेल व्यवसायिकांची भेट घेतल्यानंतर असा प्रकार वेंगुर्ले आणि मालवणमध्ये नुकताच घडल्याचेही लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. पोलिस निरिक्षक हुंदळेकर यांनी तात्काळ ऑनलाईन सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवा, अशी सूचना केली. त्यानुसार लोके यांनी दुपारी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, शहरातील अन्य एक हॉटेल व्यावसाईकाला अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या व्यावसाईकांना संशय आला. त्यांनी त्या मोबाईल कॅालकडे लक्ष दिले नाही.