पावस ः मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल धोकादायक
पावस ः मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल धोकादायक

पावस ः मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल धोकादायक

sakal_logo
By

( टुडे पान ३ )

rat४p२.jpg ः

६०२१७

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल.

मावळंगे धनगरवाडी परिसरात गंजलेले पोल धोकादायक

सकाळ वृत्तसेवा

पावस, ता. ४ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे धनगरवाडी परिसरामध्ये विद्युत खांबांची वाईट अवस्था झाल्याने संबंधित खात्याकडे निवेदन सादर केले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या कोणत्याही क्षणी खांब कोसळण्याची शक्यता आहे. वेळीच लक्ष न दिल्यास दुर्घटना घडू शकते हे लक्षात घेऊन तातडीने लोखंडी खांब बदलण्यात यावेत, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
मावळंगे धनगरवाडी परिसरात चार राहती घरे असून लहान मुलांसह कुटुंबांचा वावर आहे. येथील ग्रामस्थ मोलमजुरीकरिता बाहेर जात असतात व मुले जवळपास खेळत असतात. या परिसरातील चार लोखंडी खांब पूर्णपणे गंजलेल्या अवस्थेत आहेत. या संदर्भात संबंधित खात्याला मार्चमध्ये निवेदन देण्यात आले. या परिसरातील गंजलेले पोल तुटून पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. या संदर्भात निवेदन देऊन अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. वायरमन यांनी फोटो काढून संबंधित विभागाला कळवले आहे तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. लोखंडी खांबाच्या तळालाच गंज धरल्यामुळे संबंधित खात्याने तात्पुरते सिमेंट टाकून खांब मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे संबंधित लोखंडी खांब तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.