राष्ट्रीय खो-खो स्पर्धत मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय खो-खो स्पर्धत मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी
राष्ट्रीय खो-खो स्पर्धत मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी

राष्ट्रीय खो-खो स्पर्धत मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी

sakal_logo
By

rat4p3.jpg
60218
रत्नागिरीः सुवर्णपदक विजेत्या सत्कारमूर्ती मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत यांच्यासह व्यवस्थापक विनोद मयेकर. सोबत साक्षी रावणंग, दत्तात्रय साळवी, प्रसाद सावंत, पंकज चवंडे, राजेंद्र चव्हाण, संतोष रावणंग, प्रशांत कवळे, सचिन लिंगायत, भाऊ पालये, राजेश कळंबटे आणि अन्य.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धत मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी
शिवाजी क्रीडांगणावर सत्कार ; व्यवस्थापक मयेकर यांनाही गौरवले
रत्नागिरी, ता. ४ ः फलटण (जि. सातारा) येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. किशोरी संघात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणार्‍या मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत तर किशोर संघात अर्थव गराटे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावण्यात मोलाची भूमिका बजावली. या तिन्ही खेळाडूंवर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या बलाढ्य संघापुढे अन्य राज्याच्या संघाची मात्रा चालू शकली नाही. साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत महाराष्ट्राच्या दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. किशोरी गटातील उपांत्य सामना राजस्थानबरोबर तर अंतिम सामना कर्नाटकबरोबर झाला. किशोर गटामध्ये अंतिम सामना कर्नाटकबरोबर झाला होता. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या रत्नागिरीच्या मृण्मयीने प्रत्येक सामन्यात आक्रमणात आपली चमक दाखवली. खेळाडू बाद करून महाराष्ट्राला गुण मिळवून देण्यात तिचा सहभाग होता. साक्षी लिंगायत हिनेही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. संगमेश्‍वर फणसवणे येथील अथर्व गराटेने किशोर गटात चांगला खेळ केला. किशोर संघाचे व्यवस्थापक विनोद मयेकर यांनीही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. रत्नागिरीच्या खेळाडूंनी केलेल्या समाधानकारक कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, राज्य संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे, प्रशांत देवळेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक विनोद मयेकर, प्रसाद सावंत यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
किशोरी गटात सुवर्णपदक प्राप्त खेळाडू मृण्मयी आणि साक्षी यांच्यासह व्यवस्थापक विनोद मयेकर यांचा आर्यन क्लब आणि खो-खो परिवारातर्फे येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या साक्षी रावणंग आणि संतोष रावंगण यांच्यासह खो-खो परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी रावणंग यांनी खेळाडूंचे अभिनंदन करतानाच भविष्यात अशाच पद्धतीने चांगले खेळाडू घडवावेत आणि रत्नागिरीचा झेंडा राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फडकवावा, असा विश्‍वास व्यक्त केला.