लेफ्टनंट दीपाली गावकरांचा आमदार नाईकांकडून गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेफ्टनंट दीपाली गावकरांचा 
आमदार नाईकांकडून गौरव
लेफ्टनंट दीपाली गावकरांचा आमदार नाईकांकडून गौरव

लेफ्टनंट दीपाली गावकरांचा आमदार नाईकांकडून गौरव

sakal_logo
By

६०२६३
बांव ः भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेल्या दीपाली गावकर यांचा गौरव करताना आमदार वैभव नाईक. शेजारी इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

लेफ्टनंट दीपाली गावकरांचा
आमदार नाईकांकडून गौरव
कुडाळ ः गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व शेतात राबून शिक्षण पूर्ण करणाऱ्या बांव येथील दीपाली गावकर (वय २५) या सिंधुकन्येने जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त होण्याचा मान मिळविला. तिच्या या यशाबद्दल आमदार वैभव नाईक यांनी तिच्या घरी भेट देत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, सचिन काळप, स्वप्नील शिंदे, बाळा पावसकर, अमित राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व गावकर कुटुंबीय उपस्थित होते.
-------
६०२७२
तळवडे ः म्हाळईवाडी येथे राजाराम गावडे यांना पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

उद्योजक गावडेंना ‘परिवर्तन गौरव’
वेंगुर्ले ः तळवडे (ता.सावंतवाडी) गावातील म्हाळाई देवी कला क्रीडा मंडळ यांचा या वर्षीचा परिवर्तन गौरव पुरस्कार तळवडे गावातील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते, राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे संघमालक राजाराम गावडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार युवा उद्योजक तथा हिंद मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे, तळवडे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल राऊळ, केशव उर्फ दादा परब, सुभाष कोरगावकर, प्रकाश परब, बाळू साळगावकर, बाळू कांडरकर, अनील परब, सुरेश गावडे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित करण्यात आला. गावडे यांच्या उद्योजक क्षेत्र सामाजिक तसेच क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव मंडळाकडून करण्यात आला.
-----------
६०२७१
आचरा ः महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.

महावितरणकडे मेळाव्याची मागणी
आचरा ः शेतकरी व व्यावसायिक ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्राहक मेळावा घेण्याबाबत लेखी निवेदन आदर्श व्यापारी संघटना आचरातर्फे आचरा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांना दिले. यावेळी आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष वामन आचरेकर, माजी अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी, जयप्रकाश परुळेकर, निखिल ढेकणे, परेश सावंत, उदय घाडी, सिद्धार्थ कोळगे, मिनल कोदे, करीश्मा सक्रू यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या निवेदनाद्वारे विद्युत मंडळासंदर्भात शेतकरी, व्यावसायिक ग्राहकांना अनेक अडचणी येत आहेत. विज नियामक मंडळाच्या निर्देशानुसार दर महिना ग्राहक मेळावा घेणे आपणास बंधनकारक आहे. या दृष्टीने येत्या १५ नोव्हेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ग्राहक मेळावा आयोजित करुन सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
-------------
भिरवंडेतील मंदिरात सोमवारी दीपोत्सव
कणकवली ः भिरवंडे येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे सोमवारी (ता.७) ११ हजार १११ दिव्यांचा दीपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळून निघणार आहे. दीपोत्सव रात्री ८.३० वाजता होणार असून त्यानंतर रात्री ९.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला भिरवंडे रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणारा दीपोत्सव यंदा ७ ला साजरा होणार आहे. भाविकांना तेल आणि तुपाचा दिवा श्री देव रामेश्वर चरणी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. यंदा दीपोत्सवानंतर रात्री ९.३० वाजता चिमणी पाखरं डान्स अ‍ॅकॅडमी, कुडाळ यांचा ’जलवा २०२२ कलागुणांचा’ हा कार्यक्रम होणार आहे.
-----------
सातार्ड्यात सोमवारी जत्रोत्सव
सातार्डा ः सातार्डा ग्रामदैवत श्री रवळनाथ देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव ७ ला व श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा ८ ला होणार आहे. जत्रोत्सवादिवशी सोमवारी सकाळी देवस्थानच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर रात्री ९ वाजता आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सायंकाळी श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता कौल सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
--
मालवणात उद्या सेवक संघ सभा
मालवण ः तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवारी (ता.६) सायंकाळी पाचला येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित केली आहे. या सभेस सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.