रामराज्य रथयात्रा आज बांद्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामराज्य रथयात्रा आज बांद्यात
रामराज्य रथयात्रा आज बांद्यात

रामराज्य रथयात्रा आज बांद्यात

sakal_logo
By

60264
बांदा ः येथे रथयात्रेची माहिती देताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

रामराज्य रथयात्रा आज बांद्यात

राममंदिराची प्रतिकृती; भाविकांना दर्शन घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेला
बांदा, ता. ४ ः श्री रामराज्य रथयात्रेचे शहरात उद्या (ता.५) सकाळी नऊला आगमन होणार असल्याने या रथयात्रेचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून ही यात्रा गोव्याला रवाना होणार आहे.
रथयात्रेचे नियोजन करण्यासाठी काल सायंकाळी उशिरा येथील श्री भूमिका मंदिरात बैठक झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, जिल्हा धर्म प्रचार प्रमुख सुनील सावंत, प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, बजरंग दल कार्यकर्ते अमित बांदेकर, रोहन बांदेकर, देवस्थान समिती अध्यक्ष सुभाष मोर्ये, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, मकरंद तोरसकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, भूषण सावंत, रत्नाकर आगलावे, अवंती पंडित, अरुणा मोर्ये, बाबल मोर्ये आदी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर ओवेस कॉम्प्लेक्स येथे रथाचे स्वागत होणार आहे. अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिराची प्रतिकृती रथात उभारण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष राम मंदिराचे दर्शन घडणार आहे. रथात श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन देखील भाविकांना घेता येणार आहे. दर्शन कार्यक्रम झाल्यानंतर रथ गोवा म्हापसा येथे मार्गस्थ होणार आहे. या रथयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री रामांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन केले आहे.