एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचाचा 7वा वर्धापनदिन 13 नोव्हेंबरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचाचा 7वा वर्धापनदिन 13 नोव्हेंबरला
एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचाचा 7वा वर्धापनदिन 13 नोव्हेंबरला

एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचाचा 7वा वर्धापनदिन 13 नोव्हेंबरला

sakal_logo
By

( टुडे पान ३ )

एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचचा १३ ला वर्धापनदिन

यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती ; मुलामुलींचे सादरीकरण

मंडणगड, ता. ४ ः तालुक्यातील लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथील एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचाचा ७वा वर्धापनदिन १३ नोव्हेंबरला पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी-मुंबई येथे संध्याकाळी सात ते नऊ यावेळेत होणार आहे. विविध क्षेत्रात आपले करिअर साध्य करत विशिष्ट यश मिळवलेल्या आजी-माजी विद्यार्थी यांची परिसंवादाद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे. तसेच यामध्ये करमणूक कार्यक्रम म्हणून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मुलामुलींचे सादरीकरण तसेच मागील सात वर्षांच्या मंच उपक्रमांची चित्रफित प्रदर्शित करण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंचचे सचिव नरेश चव्हाण यांनी दिली.

मंचाच्या माध्यमातून प्रथम वर्धापनदिन निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंध अंक प्रकाशन, हायस्कूलसाठी मंचाने बांधलेल्या खुला सभागृह तसचे स्टेजचे उद्घाटन केले आहे. द्वितीय वर्धापनदिनानिमित्त माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मुंबई-माटुंगा येथे निवेदिका नम्रता वागळे यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण केले आहे. तृतीय वर्धापनदिन मंच २०१९ दिनदर्शिका प्रकाशन आणि भव्य रक्तदान शिबिर घेतले. चौथ्या वर्धापनदिन निमित्ताने रत्नागिरी जिल्हाअंतर्गत मंच एकता मॅरेथॉनचे आयोजन, एक धाव शाळेसाठी-एक धाव आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाचव्या वर्धापनदिन निमित्ताने मंच २०२१ दिनदर्शिका प्रकाशन, कोव्हिड योद्धा सन्मान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहाव्या वर्धापनदिनानिमित्त लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथील विद्यार्थ्यांच्या ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी अशा दोन गटात शिवकालीन किल्ले प्रतिकृती स्पर्धा, मंच २०२२ दिनदर्शिकेचे दहागाव हायस्कूलमध्ये प्रकाशन करण्यात आले आहे.