शुभांगी चव्हाण यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुभांगी चव्हाण
यांना पुरस्कार
शुभांगी चव्हाण यांना पुरस्कार

शुभांगी चव्हाण यांना पुरस्कार

sakal_logo
By

सातेरी रवळनाथ
उत्सव ७ पासून
सावंतवाडी ः ओटवणे येथील श्री सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या वार्षिक उत्सवास ७ पासून प्रारंभ होत आहे. सहा दिवसांच्या या उत्सवाची सांगता १२ ला होणार आहे. ८ ला सात प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी, १९ ला दुपारी हरिनाम सप्ताह सांगता, १० ला सरकारी समराधना, ११ ला गुरांची समराधना होणार आहे. १२ ला ‘पंचमीची जत्रा’ निमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूक, आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, सचिव रमेश गावकर आदींनी केले आहे.
--
६०३१५
शुभांगी चव्हाण

शुभांगी चव्हाण
यांना पुरस्कार
सावंतवाडी ः माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याचे वितरण ७ ला अहमदनगर येथे मुख्याध्यापक महामंडळाच्या अधिवेशनात होणार आहे.
---
चोरीचा तपास
युद्धपातळीवर
आंबोली ः आंबोली-कामतवाडी येथील शिक्षक रामा भिकाजी गावडे यांच्या घरात झालेल्या चोरीचा तपास करण्यासाठी ओरोस येथील गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील मोबाईल टॉवर लोकेशनचे कॉल डिटेक्ट केले असून त्यातून धागेदोरे मिळतात काय, याची तपासणी सुरू आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज पाटील हे गुरुवारी सकाळपासूनच आंबोलीत ठाण मांडून आहेत.
---------------------
मुळेदेत ७ पासून
दर्शन सोहळा
कुडाळ ः मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान (ता. कुडाळ) येथील नवनाथ उपासक प. पू. श्री. बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमी येथे कार्तिक शुद्ध ७ व ८ रोजी कार्तिक स्वामींच्या दर्शनाची संधी लाभणार आहे. कार्यक्रम असे ः ७ ला दुपारी ४.१७ ते मंगळवारी दुपारी ४.३२ पर्यंत वाजता दर्शन. लाभ घ्यावा, असे आवाहन ॐ श्री नवनाथ उपासक प. पू. श्री. बा. म. घडशी महाराज तपोभूमी मुळदेतर्फे केले आहे.