रहाटाघरची तत्काळ रंगरंगोटी, परिसर काँक्रिटीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटाघरची तत्काळ रंगरंगोटी, परिसर काँक्रिटीकरण
रहाटाघरची तत्काळ रंगरंगोटी, परिसर काँक्रिटीकरण

रहाटाघरची तत्काळ रंगरंगोटी, परिसर काँक्रिटीकरण

sakal_logo
By

(टुडे पान १ साठी)

rat४p१.jpg-

६०२१६
रत्नागिरी- जिल्हा परिषद नूतन इमारतीच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री उदय सामंत व संबंधित अधिकारी व पदाधिकारी.


रहाटाघरची तत्काळ रंगरंगोटी, परिसर काँक्रिटीकरण

पालकमंत्री सामंतांचे आदेश ; शहरातील विकासकामांची पाहणी

रत्नागिरी, ता. ४ ः पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील विविध विकासकामांची आज प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांना गती मिळावी यासाठी संबंधितांना सूचना केल्या. रहाटाघर बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकांची पाहणी केली. रहाटाघर बसस्थानकाची रंगरंगोटी आणि परिसर सिमेंट काँक्रिटीकरणासाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करा तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उदय सामंत यांनी आज रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. त्या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी रहाटाघर बसस्थानकाला भेट दिली. यापूर्वीदेखील त्यांनी अचानक भेट देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर साफसफाई आणि इतर कामे करण्यात आली; परंतु आज सामंत यांनी भेट दिल्यानंतर रहाटाघर बसस्थानकाची रंगरंगोटी करा तसेच परिसर सिमेंट काँक्रिटीकरणासाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही, तर अनेक वर्षे रखडलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा, असे आदेश दिले.
या वेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय अभियंता मोहिते, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. पाटील उपस्थित होते. त्यानंतर सामंत यांनी लोकमान्य टिळक स्मारक, तारांगण, लोकमान्य टिळक वाचनालय, रत्नागिरी पालिकेच्या नूतन इमारतीचे काम, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. ही कामे युद्धपातळीवर करून घ्यावी, अशा सूचना संबंधितांनी दिल्या. त्यानंतर सामंत यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन तेथील विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.