राजीवडा खाडी मुखाच्या गाळावर तत्काळ तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीवडा खाडी मुखाच्या गाळावर तत्काळ तोडगा
राजीवडा खाडी मुखाच्या गाळावर तत्काळ तोडगा

राजीवडा खाडी मुखाच्या गाळावर तत्काळ तोडगा

sakal_logo
By

rat४p३१.jpg
६०२९०
रत्नागिरीः पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनतादरबारात आपली कैफियत मांडताना तक्रारदार.
rat४p३२.jpg
६०२९१
सर्व खात्याचे अधिकारी आणि तक्रारदारांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था.
rat४p३३.jpg
६०२९२
तक्रारदारांना नावनोंदणीसाठी उभारलेले दालन.
---------------
राजीवड्यातील गाळावर तत्काळ तोडगा
पालकमंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार; अनेक प्रश्‍न जागेवरच निकाली
रत्नागिरी, ता. ४ः उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पहिल्याच जनता दरबारात राजीवडा खाडी मुखातील गेली ३० वर्षे अडकलेला गाळ काढण्याचा प्रश्न जागेवर सोडवत मेरीटाईम बोर्डाला धारेवर धरले. मालवण येथील ड्रेझर बोलवून घ्या आणि तत्काळ कामाला सुरवात करा असे आदेशही त्यांनी बोर्डाला दिले. जनता दरबाराला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व क्षेत्रातील नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आले होते. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याचे तत्काळ म्हणणे ऐकून जागेवर निर्णय घेतले गेले. तक्रारी जागेवर निकाली काढल्याने बहुतांशी लोक समाधानी होऊन गेले. दुपारी २ पर्यंत चालणारा जनता दरबार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होता.
राजीवडा खाडीमुखाशी साचलेल्या गाळासंदर्भात मच्छीमार सोसायटीने जनतादरबारात तक्रार केली. सोसायटीचे पदाधिकाऱ्यानी आपली कैफियत मांडली. गाळ न काढल्याने भरती-ओहोटीची वाट पाहून मासेमारीला जावे लागले. अंदाज येत नसल्याने अनेक नौकांचा अपघात झाला आहे. लवकरात लवकर गाळ काढावा, अशी आमची मागणी आहे. यावर पालकमंत्री सामंत यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत काही दिवसांपूर्वी हा विषय तुमच्याकडे आला होता. काय केले तुम्ही विचारता गाळ काढण्यासाठी १ कोटी २६ लाखाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवल्याचे अधिकाऱ्यानी सांगताच गाळ काढण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे का? असे सामंत यांनी विचारले. तेव्हा अधिकारी म्हणाले, आपल्याकडे ड्रेझर, जेसीबी, कटर आदी साहित्य आहे. ते कुठे आहे विचारता सिंधुदुर्गमध्ये मालवणला आपला ड्रेझर आहे, असे उत्तर मिळाले. कोकण पॅकेजमधून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ड्रेझर खरेदी केला होता. मग आपल्याला तो कधी मिळणार विचारत आपण तत्काळ संबंधितांशी संपर्क साधून ड्रेझर बोलावून घ्या, लवकरात लवकर गाळ काढण्यास सुरवात करण्याचे आदेश दिले.
अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कामकाज सुरू होते. तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची नोंद बाहेर काउंटरवर करायची होती. नागरिकांना बसण्यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता. नोंद झालेल्या तक्रारदारांची यादी संगणकावर करण्यात आली होती. त्याची पूर्ण माहिती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जात होती. त्यानंतर प्रत्येकाला टोकन देऊन अधिकाऱ्यांच्या मध्ये बसण्यासाठी तक्रारदारांना व्यवस्था केली केली. तक्रार थेट ऐकून घेतली जात होती. ''साहेब मी चिपळूणहून आलो आहे. माझ्या फेरफाराबद्दल कोणतेही उत्तर दिले जात नाही'', त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चिपळूण तहसीलदारांना विचारून तिथेच त्यावर तोडगा काढला जात होता. त्याचे समाधान झाले की, दुसरी तक्रार घेतली जात होती. जिल्ह्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व अधिकारी तिथे असल्याने अनेक तक्रारी जागेवर निकाली काढण्यात आल्या.

चौकट
जनता दरबाराची जोरदार चर्चा
जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या पहिल्याच जनता दरबाराची जोरदार चर्चा होती. त्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाने जिल्हाभरात जनतादरबाराचे बॅनर लावून वातावरण निर्मिती केली. या दरबाराची मोठी हवा झाली. दरबारात सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित असल्याने जागेवर प्रश्न सुटणार याची खात्री नागरिकांना होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आपली कैफियत घेऊन आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहामध्ये हा दरबार भरवण्यात आला होता.


चौकट-
रिफायनरी समर्थनार्थ शिष्टमंडळही
राजापूर येथील नाणार रिफायनरीबाबतही एक शिष्टमंडळ प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी आले होते. त्यांचे निवेदन घेऊन त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला प्रकल्पाबाबत पुढचे पाऊल टाकायचे आहे. कोणावरही हा प्रकल्प लादायचा नाही. नागरिकांना समजून घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.