रामराज्य रथयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामराज्य रथयात्रा
रामराज्य रथयात्रा

रामराज्य रथयात्रा

sakal_logo
By

(पान २ मेन )


rat४p७.jpg ः
६०२३६
रत्नागिरी ः रामराज्य रथयात्रा शुक्रवारी रत्नागिरीत आली असता झालेली गर्दी.

rat४p८.jpg
६०२३७
रथामधील देखणी रामसीतेची मूर्ती.

rat४p९.jpg ः
६०२३८
आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेत होता.

rat४p१२.jpg ः
६०२३५

रामराज्य रथयात्रेचे दर्शन घेतल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना प्रसाद अर्पण करताना साधक.

----------
भारतात रामराज्य स्थापनेचे रथयात्रेचे उद्दिष्ट

रत्नागिरीत जल्लोषात स्वागत ;सामूहिक आरतीने भारले वातावरण

रत्नागिरी, ता. ४ ः रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटी व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने भारताला पुन्हा राममय करून भारतात रामराज्याची स्थापना करणे या उद्देशाने आयोजित रथयात्रा गुरुवारी (ता. ३) रत्नागिरी जिल्ह्यात आली. चिपळूणहून निघालेल्या रथयात्रेचे हातखंबा, श्री महालक्ष्मी मंदिर, खेडशी, मारूती मंदिर, (कै.) प्रमोद महाजन क्रीडासंकूल रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाई यांचे दर्शन घेतले. या वेळी सामूहिक आरती करण्यात आली.
आज पहाटे ५ ते ७.३० या वेळेत प्रमोद महाजन क्रीडासंकूल येथे श्रीरामपूजा, हवन, रथपूजा, गौपूजन, वृक्षपूजन आदी धार्मिक विधी शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत यथासांग पार पडले. त्यानंतर रथयात्रा लांजा येथे रवाना झाली. रत्नागिरीनजीकच्या खेडशी येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे ही यात्रा थांबली तेथेही या यात्रेचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ही रथयात्रा २०२२ विजयादशमीला म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून श्रीक्षेत्र अयोध्या येथून सुरू झाली आहे. ती संपूर्ण भारतभर तसेच नेपाळ देशातून ६० दिवस प्रवास करून गीताजयंती म्हणजेच ३ डिसेंबरला पुन्हा श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाऊन पूर्ण होणार आहे. गुरुवारी या यात्रेचे चिपळूण, संगमेश्वर आणि हातखंबामार्गे रत्नागिरीत आगमन झाले. त्या वेळी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या रथयात्रेला भेट देऊन श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. शहरातील मारुती मंदिर येथे रामभक्तांना दर्शनासाठी श्री रामराज्य रथयात्रा थांबली. त्यानंतर जयस्तंभमार्गे आठवडा बाजारातील प्रमोद महाजन क्रीडासंकूल येथे आली.
या देशाला इंडिया न संबोधता संपूर्ण जगाने भारत असेच म्हटले पाहिजे व तसे शासनाने तो सर्वच स्तरावर बदल केला पाहिजे. तसेच रामायणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला गेला पाहिजे तरच रामाचा आदर्श घेऊन जीवन जगणारी प्रजा निर्माण होईल. भारताच्या राष्ट्रपुरुषांचा देदिप्यमान इतिहास शिकवला पाहिजे. या तीन मागण्या केंद्र सरकारकडे आम्ही करत आहोत, असे संयोजकांनी सांगितले.
या वेळी हिंदू राष्ट्रसेनेचे चंद्रकांत राऊळ, गौरव पावसकर, गोसेवा संघाचे गणेश गायकवाड, सुशील कदम, विशाल पटेल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, विश्व हिंदू परिषदेचे सचिन रेमणे, बजरंग दलचे विराज चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रंजन आगाशे, युवराज चिखले, हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी, सनातन संस्थेचे संजय मुळ्ये आदी उपस्थित होते.