‘सी वर्ल्ड’, ‘नाणार’ला व्यत्यय नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सी वर्ल्ड’, ‘नाणार’ला व्यत्यय नको
‘सी वर्ल्ड’, ‘नाणार’ला व्यत्यय नको

‘सी वर्ल्ड’, ‘नाणार’ला व्यत्यय नको

sakal_logo
By

60354
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीयमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी.


‘सी वर्ल्ड’, ‘नाणार’ला व्यत्यय नको

केंद्रीय मंत्री नारायण राणे ः दोन्ही प्रकल्पांसाठी एकत्रीत प्रयत्नांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः कोकणच्या विकासासाठी सी वर्ल्ड प्रकल्प व नाणार प्रकल्प होणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रकल्पात राजकीय व्यत्यय सहन केला जाणार नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हा नियोजन बैठकीत केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या समारोप प्रसंगी मंत्री राणे यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टिने काही संकल्पना पालकमंत्री चव्हाण यांच्या समोर मांडल्या. जिल्ह्याचे भूमिपुत्र पालकमंत्री झाल्याने आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे सांगत राणे यांनी सी वर्ल्ड व नाणार प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी देशातील काही मंदिरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमकडून विकसित केली जात आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, रामेश्वर व जगात एकमेव असलेले किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिराचा आराखडा जिल्हाधिकारी यांनी तयार करावा. तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणी राणे यांनी केली. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी हा जिल्हा डोंगराळ आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय व राज्य मार्ग, जिल्हा व तालुका मार्ग तसेच समुद्रकिनारी जाणारे मार्ग, पर्यटन स्थळी जाणारे मार्ग याची माहिती घेवून त्याचा आराखडा तयार करावा. तो शासन दरबारी ठेवून निधी आणावा, पुढील सभेत हा आराखडा ठेवण्याची सूचना पालकमंत्र्यांना केली. तसेच जिल्ह्यात ९४५ कुपोषित बालके आहेत. त्यातील ६० बालके तीव्र कुपोषित आहेत. ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तीन ते सहा महिन्यांची मोहीम राबवावी, असे आवाहन केले. जिल्हा कुपोषणमुक्त झाल्याशिवाय तुम्हाला जिल्ह्याबाहेर सोडणार नाही, असेही मंत्री राणे यांनी यावेळी मंजूलक्ष्मी यांना सांगितले. जिल्ह्याच्या आरोग्य विभागात ३७८ रिक्त पदे आहेत. ही पदे तातडीने भरावीत. विजयदुर्ग व रेडी बंदराची काय स्थिती आहे? याचा आढावा घ्यावा. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करुया. ३१ मार्च २०२३ पूर्वी सर्व निधी खर्च करूया, असेही आवाहन यावेळी मंत्री राणेंनी केले.

चव्हाणांसह केसरकरांचे सहकार्य घेण्याची सूचना
यावेळी मंत्री राणे यांनी जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांना जिल्ह्यात रोजगार वाढण्यासंदर्भात बैठक बोलाविण्याचे आवाहन केले. आपल्याकडे खाते असलेल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग विभागाच्यावतीने कोणते उद्योग जिल्ह्यात येवू शकतात. त्यातून जास्तीतजास्त कसा रोजगार निर्माण होईल? यासाठी नियोजन करूया. याकरिता पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही सहकार्य घेवूया, असे राणे म्हणाले.

इंटरनेटचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दुष्ट्या आदर्श जिल्हा म्हणून आम्हाला जाहीर करायचा आहे. यासाठी आम्ही अतिरिक्त निधी जिल्ह्याला देण्याचे नियोजित केले आहे. या जिल्ह्यात इंटरनेटची मोठी समस्या आहे. यासाठी पालकमंत्री म्हणून आपण सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांना केले.

जिल्हा सर्वच क्षेत्रात वरचढ ठरवूया
पालकमंत्री चव्हाण यांनी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनात आदर्श आहे. स्वच्छतेत एक नबर आहे. दहावी, बारावी निकालात एक नंबर आहे. त्याप्रमाणे सर्वच क्षेत्रात आपल्याला हा जिल्हा अग्रेसर करायचा आहे. यासाठी विकास आराखडे तयार करून आपल्याला सर्वांना काम करायचे आहे, असे प्रतिपादन केले.
----------
चौकट
पालकमंत्री म्हणून तुमच्या सोबत
यावेळी खासदार राऊत यांनी स्वदेश दर्शन टप्पा २ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केंद्र सरकारने केला आहे. यातून पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात सकावांची स्थिती गंभीर आहे. यासाठी आराखडा तयार करून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली. पालकमंत्री म्हणून आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत, असा शब्द मंत्री चव्हाण यांना दिला.
------------
चौकट
मत्स्य विभागासाठी जादा निधी द्या
जिल्हा नियोजन निधीतून मत्स्य विभागासाठी जादा निधीची तरतूद करावी. सध्याचा निधी कमी पडत आहे. मच्छीमारांना डिझेल परतावा मिळालेला नाही, याकडे आ राणे यांनी लक्ष वेधले. मत्स्य विभाग अधिकार्‍यांनी ९ कोटींचा परतावा शिल्लक आहे. नवीन प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत, असे सांगितले. आ वैभव नाईक यांनी निधी खर्च न केल्याने गतवर्षी जिल्हा परिषदेचा निधी मागे गेला होता. यावर्षी तसे होवू नये यासाठी सीईओ नायर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.