समर्थ रंगभूमीतर्फे आज मराठी रंगभूमीदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ रंगभूमीतर्फे आज मराठी रंगभूमीदिन
समर्थ रंगभूमीतर्फे आज मराठी रंगभूमीदिन

समर्थ रंगभूमीतर्फे आज मराठी रंगभूमीदिन

sakal_logo
By

समर्थ रंगभूमीतर्फे
आज मराठी रंगभूमीदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः समर्थ रंगभूमी रत्नागिरीतर्फे मराठी रंगभूमीदिन शहरातील जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात उद्या (ता. ५) सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन, त्यानंतर नांदी सादर करण्यात येईल. नंतर प्रास्ताविक व ज्येष्ठ गायक नट परशराम केळकर यांचा संगीतसेवेबद्दल जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये विजय साळवी लिखित सम्राट या एकांकिकेचे अभिवाचन समीक्षा सावंदेसाई आणि सुशील जाधव करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ गायक केळकर यांची सुश्राव्य नाट्यसंगीत मैफल सादर होणार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मिलिंद सावंत, विनय घोसाळकर, सुहास साळवी, चंद्रमोहन देसाई, प्रदीप मोरे आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे आभार जयदेव शिंदे मानणार आहेत. या कार्यक्रम व नाट्यमैफलीला नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन समर्थ रंगभूमीतर्फे करण्यात आले आहे.