राऊतांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावे
राऊतांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावे

राऊतांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावे

sakal_logo
By

60373
सिंधुदुर्गनगरी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजेश क्षीरसागर.

राऊतांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावे

राजेश क्षीरसागर ः मातोश्रीवर कान फुंकण्याचे काम

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः खासदार विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन कान फुंकण्याचे व दुसऱ्यांबाबत गैरसमज पसरवण्याचे काम केले. त्यांना स्वतःला क्रेडिट घेण्याचे व्यसनच जडले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या ३६ वर्षे शिवसेना वाढविण्यासाठी काम करणाऱ्या कडवट शिवसैनिकाला अन्य मार्ग शोधावा लागला. खासदार राऊत हे २०१९च्या निवडणुकीत युतीच्या जोरावर निवडून आले. आता त्यांनी निवडून येऊन दाखवावे. ते पुढील २०२४ ला खासदार नसतील, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेतून लगावला.
जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना क्षीरसागर म्हणाले, ‘‘मी प्रामाणिकपणे शिवसेना वाढविण्यासाठी तब्बल ३६ वर्षे मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो. शिवसेनेसाठी मेहनत घेऊन काम केले; परंतु, सर्व चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार राऊत हे नेहमी पुढे असायचे. माझ्या विरोधात कान भरण्याचे काम त्यांनी केले. गैरसमज पसरविला. त्यांना फुकाचे क्रेडिट घेण्याचे व्यसन जडले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक कडवट शिवसैनिकांना अन्य मार्ग शोधावा लागला. आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर आणि युतीच्या जोरावर २०१९ ची निवडणूक जिंकून येणाऱ्या राऊत यांनी २०२४ ची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी. ते २०२४ मध्ये खासदार नसतील. त्यासाठी गरज पडली तर त्यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत सिंधुदुर्गात येईन.’’
--
क्षीरसागर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा निसर्गरम्य पर्यटन जिल्हा आहे. येथे लाखो पर्यटक येतात. त्यादृष्टीने येथील विकास झाला पाहिजे. जिल्ह्यातील नदीचा गाळ काढणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी जिल्ह्याचा आराखडा व्हावा. नाविन्यपूर्ण योजनांमधून जिल्ह्यात शाश्वत मालमत्ता तयार झाली पाहिजे. त्यादृष्टीने कामे सुचवली पाहिजेत, बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्ह्यात स्मारक व्हावे, तीन महिन्यांतून एकदा नियोजन सभा व्हावी, जिल्हा नियोजनसाठी मिळणारा निधी चांगल्या कामांसाठी खर्च करून त्याचे फलित दिसले पाहिजे, आदी सूचना आजच्या नियोजन समिती सभेत केल्या आहेत.’’
---
निधी खर्चाचे नियोजन करा
जिल्ह्यात चांगली विकास कामे सुरू आहेत. पुढील काळातही हे सरकार चांगले काम करेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेला निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल; परंतु, निधी खर्चाचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेचे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनकडे मिळणारा निधी १०० टक्के खर्च करण्याचे योग्य नियोजन करा. निधी कमी पडू देणार नाह, असे क्षीरसागर म्हणाले.’’