हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मितीचा प्रकल्प राज्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मितीचा प्रकल्प राज्यात
हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मितीचा प्रकल्प राज्यात

हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहन निर्मितीचा प्रकल्प राज्यात

sakal_logo
By

पान १ साठी

राज्यात हायड्रोजनवर चालणारा
वाहननिर्मितीचा प्रकल्प लवकरच
उद्योगमंत्री उदय सामंत; अमेरिकेचे शिष्टमंडळ रत्नागिरीतही येणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रोजन पॉलिसीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कुटर तसेच बोटीनिर्मिती करणारा परदेशी प्रकल्प राज्यात येणार आहे. याबाबतचा करार करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यातील एक पथक रत्नागिरीतही येणार आहे. एवढेच नव्हे, तर जपानमधील सुमिटोमो कंपनीचा सुमारे २ लाख कोटींची गुंतवणूक असणारा इलेक्ट्रॉनिक प्रकल्प रांजणगाव येथे येऊ घातला आहे. येत्या काळात असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पांना एक इंचही जागा पूर्वीच्या सरकारने दिली नाही, असा चिमटा काढत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातून जाणाऱ्या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच राज्याला मोठा दिलासा देणारी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘राज्यात लवकरच हायड्रोजन चालणाऱ्या वाहनांचा मोठा प्रकल्प येऊ घातला आहे. अमेरिकेतील परदेशी कंपनीशी त्याबाबत चर्चा झाली आहे. करार करण्यासाठी लवकरच त्यांचे शिष्टमंडळ राज्यात येणार आहे. त्यापैकी एक टीम रत्नागिरीतही येणार आहे. या सर्व घडामोडीमुळे राज्यात मोठी गुंतवणूक करणारे प्रकल्प येत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे, यासाठी ही माहिती देत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातून प्रकल्प गेल्याची ओरड सुरू आहे; परंतु येत्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या धोरणानुसार अनेक मोठे प्रकल्प राज्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगसाठी जास्त कालावधी लागतो. मात्र, हायड्रोलिक वाहने पेट्रोल भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत म्हणजे ४ ते ६ मिनिटांत ही वाहने पुन्हा धावणार अशी यंत्रणा आहे.’’
रांजणगावलादेखील जपानमधील मोठी कंपनी सुमारे २ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहेत. हा इलेक्ट्रॉनिकचा प्रकल्प असून यातून ३ हजार जणांना रोजणार मिळणार आहे. त्यासाठी ११ हजार ८८७ स्क्वेअर फूट जागा लागणार आहे. दोन वर्षांत पायउतार झालेल्या सरकारने एक इंचही जागा प्रकल्पाला दिली नाही. आम्ही तत्काळ याबाबतचा निर्णय घेऊन हा प्रकल्प राज्यात आणला आहे. परदेशी कंपन्यांचे बीकेसीत मोठे ऑफिसही उघडले जाणार आहे. त्यामुळे हजारोंना रोजगार मिळणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील प्रकल्प अन्य राज्यांत जात असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे प्रकल्प आणून चोख उत्तर दिले.