पहिल्या जनता दरबारमध्ये 400 तक्रार अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या जनता दरबारमध्ये 400 तक्रार अर्ज
पहिल्या जनता दरबारमध्ये 400 तक्रार अर्ज

पहिल्या जनता दरबारमध्ये 400 तक्रार अर्ज

sakal_logo
By

(पान ३ )

फोटो-
rat४p४५.jpg-
६०४०२

रत्नागिरी- पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनतादरबारात कैफियत मांडताना तक्रारदार. सोबत अन्य अधिकारी वर्ग.
------------

पहिल्या जनता दरबारमध्ये चारशे तक्रार अर्ज

उदय सामंत ; तक्रारी तात्काळ मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध

रत्नागिरी, ता. ०४ : जनता दरबारात दिवसभरात विविध क्षेत्रातील आणि वैयक्तीक अशा ४०० तक्रारी आल्या. त्यापैकी धोरणात्मक निर्णय वगळता बहुतेक तक्रारी जागेवर निकाली काढल्या. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अधिकारी व राजकीय प्रतिनिधी यांच्यापर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृह येथे आयोजित जनता दरबारामध्ये ते बोलत होते. सामंत म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जनतेच्या अडचणी सोडविणे हे माझे प्राधान्यक्रम आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या याचे समाधान व्यक्त केले. जनता दरबारामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा दर आठ दिवसानी घेण्यात येईल. आजच्या जनता दरबाराप्रमाणे दर महिन्याला जनता दरबाराचे आयोजन जिल्ह्यातील अन्य तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील जनतेच्या अडचणींचे निराकरण संबंधित स्तरावर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या जनता दरबारात ४०० अर्ज प्राप्त झाले. यामध्ये पालिका, महावितरण, महसूल, क्रीडा, कामगार, वन विभाग, कृषि, शिक्षण, आरोग्य, गृह, मेरीटाईम बोर्ड, रोजगार हमी योजना आदी विभागांशी संबंधित होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती शुभांगी साठे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते.


केंद्रशाळा लोटेमाळचा गौरव

जिल्हा परिषद केंद्रशाळा लोटेमाळ या शाळेला स्वच्छ विद्यालय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला व बाल विकास विभागाच्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या लाभार्थी वैष्णवी सूरज पानकर, भैरवी सचिन भोळे, शांभवी सचिन भोळे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.


डिस्ट्रीक डॅशबोर्ड यंत्रणा सुरु करणार

जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजाच्या समस्या सोडविण्यासाठी डिस्ट्रीक डॅशबोर्ड ही यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. ही यंत्रणा सुरु करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. या बोर्डावर सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.