व्हेलची तीन कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेलची तीन कोटींची
उलटी जप्त; तिघांना अटक
व्हेलची तीन कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक

व्हेलची तीन कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक

sakal_logo
By

(संशयीत आरोपी फोटो - ६०४१७, ६०४१८, ६०४१९)


६०३५५
कोल्हापूर ः व्हेल माशाची उलटी येथे शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केली. या प्रकरणी तिघांना अटक केली.


व्हेलची तीन कोटींची
उलटी जप्त; तिघांना अटक
सरनोबतवाडीत कारवाई; गाडीही जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः व्हेल माशाची उलटी (अँम्बरग्रीस) बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या तिघांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. प्रदीप शाम भालेराव (वय ३६, शहाजीनगर, अजीज बाग, आर. सी. मार्ग, मावळरोड, चेंबूर, मुंबई), शकील मोईन शेख (३४, माणिकनगर, येरवडा, पुणे), अमीर हाजू पठाण (३२, विश्रांतीवाडी, भैरवनगर, गणपती मंदिराजवळ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. सरनोबतवाडी येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेली उलटी तीन किलो ४१३ ग्रॅम असून, त्याची किंमत तीन कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार श्रीकांत मोहिते यांना व्हेल माशाची उलटी घेऊन काहीजण मोटारीतून सरनोबतवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस आणि वनखात्याने सापळा रचला. संशयितांची गाडी दिसल्यावर पोलिसांनी रोखली. त्यातील तिघांकडून उलटी व गाडी जप्त केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, रफीक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी भाग घेतला.

मोठ्या रॅकेटची शक्यता
यातील शकील आणि अमीर पुण्यातून, तर प्रदीप मुंबईतून आला होता. व्हेल माशाची उलटी त्यांनी कोकणातून आणल्याचा संशय आहे. याचा व्यवहार नेमका कोणाशी आणि कोठे होणार होता, याचा तपास पोलिस करत आहेत. यामध्ये आंतरराज्य रॅकेट आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

व्हेलची उलटी बनते कशी?
दात नसलेले व दात असलेले असे दोन प्रकारचे व्हेल असतात. दात असलेल्या स्पर्म व्हेलची उलटी मौल्यवान मानली जाते. वैद्यकीय भाषेत याला ‘अँम्बरग्रीस’ असे म्हटले जाते. व्हेलचे आवडते खाद्य म्हणजे म्हाकूळ आणि कोळंबी. यातील म्हाकूळचा तोंडाकडचा चोचीसारखा भाग आणि कोळंबीचा कवचाकडचा कडक भाग पचत नाही. तो भाग व्हेल खोल समुद्रात उलटी करून बाहेर टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायने असतात. ही उलटी दीर्घकाळ लाटांवर तरंगत राहिल्यामुळे ती मेणासारखी बनते. तिचे वजन ५० किलोपर्यंत असू शकते.

का आहे इतकी किंमत
व्हेलची उलटी अत्तर उद्योगात महत्त्वपूर्ण मानली जाते. यापासून बनवलेल्या अत्तराचा वास दीर्घकाळ टिकतो. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत नाही. यामुळे नैसर्गिक तत्त्व म्हणून हा घटक वापरलेल्या अत्तराला मोठी किंमत मिळते. अगरबत्ती, धूप, औषध उद्योगातही या अत्तराचा वापर होतो. साहजिकच याला मोठी किंमत मिळते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत या उलटीची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या बऱ्याच घटना अलीकडच्या काळात उघड झाल्या आहेत.