संरक्षक भिंतीच्या कामाचा मठ-सिद्धार्थनगरीत प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संरक्षक भिंतीच्या कामाचा
मठ-सिद्धार्थनगरीत प्रारंभ
संरक्षक भिंतीच्या कामाचा मठ-सिद्धार्थनगरीत प्रारंभ

संरक्षक भिंतीच्या कामाचा मठ-सिद्धार्थनगरीत प्रारंभ

sakal_logo
By

60449
मठ ः श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करताना नितीन मांजरेकर. सोबत सरपंच दादा ठाकूर आदी.

संरक्षक भिंतीच्या कामाचा
मठ-सिद्धार्थनगरीत प्रारंभ
वेंगुर्ले, ता. ५ ः अतिवृष्टीमुळे मठ-देऊळवाडी सातेरी मंदिर येथील सिध्दार्थनगर रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सात गावाचा संपर्क तुटण्याची भीती होती. याची दखल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने घेत तत्काळ १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सात गावांचा मठ गावाशी तुटणारा संपर्क पूर्ववत झाला असून या कामाचा प्रारंभ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर याच्या हस्ते झाला.
यावेळी मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, मारुती वाघे, कांडरकर, गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मांजरेकर याच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम मठ स्वयंभू मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यात आले. सरपंच ठाकूर यांनी गावातील विविध विकासकामांबाबत मंत्री केसरकर यांना निवेदन देण्याकरिता मांजरेकर यांच्याकडे सुपूर्द केले. या कामाबद्दल ग्रामस्थ व मठ ग्रामपंचायतीने मंत्री केसरकरांचे विशेष आभार मानले.