पुरुष, महिला संघाची विजयी वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुष, महिला संघाची विजयी वाटचाल
पुरुष, महिला संघाची विजयी वाटचाल

पुरुष, महिला संघाची विजयी वाटचाल

sakal_logo
By

पान ६ साठी)

फोटो ओळी
- rat५p१.jpg-
६०४४१

रत्नागिरी ः महिलांच्या जिल्हा संघाला शुभेच्छा देताना साक्षी रावणंग. सोबत दत्तात्रय साळवी, विनोद मयेकर यांच्यासह अन्य.
-------------
रत्नागिरीच्या पुरुष, महिला संघाची विजयी सुरवात

पुरुष-महिला राज्य खो-खो स्पर्धा ः नुतन खेळाडू चमकले

रत्नागिरी, ता. ५ ः भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशन आणि हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५८वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रत्नागिरीच्या महिला संघाने जळगावचा तर पुरुष संघाने रायगडचा साखळी सामन्यात सहज पराभव करत विजयी वाटचाल सुरू केली.
हिंगोली येथील रामलीला मैदानात या स्पर्धा सुरू आहे. सकाळच्या सत्रात १९ सामने खेळवण्यात आले. महिला गटातील जळगावबरोबरचा सामना रत्नागिरीने १ डाव १६ गुणांनी (१८-२) जिंकला. अपेक्षा सुतार (४ खेळाडू), साक्षी डाफळे (३), दिव्या पालये (२), ऐश्‍वर्या सावंत (२) यांच्या धारदार आक्रमणाच्या जोरावर रत्नागिरीने जळगावचे १८ खेळाडू बाद केले. संरक्षणात आर्या डोर्लेकरने २.३० मिनिटे, साक्षी लिंगायत ३.२० मि. तर ऐश्‍वर्या सावंतने २.५० मि. नाबाद खेळ केला. पुरुष गटात रत्नागिरीने जालनावर १ डाव १४ गुणांनी विजय मिळवला. साहिल सनगले, राज पवार, साई भोसले यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केल्यामुळे रत्नागिरीने जालनाचे २४ गडी बाद केले तर संरक्षणात रोहित रांबाडे (२.१० मिनिटे), निखिल सनगले (२.१०), सिद्धांत कानडे (२ मि.), संकेत राडये (२.२० मि.), शुभम आयरे (२.५०), कल्पेश भुवड (१.५०) यांनी चांगला खेळ केला.
दरम्यान, हिंगोली येथे रवाना झालेल्या संघाला रत्नागिरीच्या माजी पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग यांनी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर त्यांच्या हस्ते महिलागटाला कीट प्रदान करण्यात आले. तसेच अव्वल कामगिरी करत खेळाडूंनी राष्ट्रीयस्तरावर भरारी घ्या, असेही सांगितले.
--------
असा आहे संघ...
*महिला संघ ः पायल पवार, गायत्री भोसले, श्रेया सनगरे, ऐश्‍वर्या सावंत, श्रावणी सावंत, अपेक्षा सुतार, दिव्या पालये, सायली कर्लेकर, आरती कांबळे, तेजल पवार, साक्षी डाफळे, आर्या डोर्लेकर, मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत, पल्लवी सनगले. प्रशिक्षक ः पंकज चंवडे.
*पुरुष संघ ः सिद्धांत कानडे, अवधुत मासये, संकेत राडये, साई भोसले, सौरभ शिंदे, रोहित रांबाडे, राज पवार, शुभम आयरे, साहिल सनगले, निखिल सनगले, प्रतीक उबरे, आशिष गोगावले, गणेश गोसावी. प्रशिक्षक ः आकाश सोळंकी.