राजापूर-मुमताज नाईक, विनया जाधव पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-मुमताज नाईक, विनया जाधव पैठणीच्या मानकरी
राजापूर-मुमताज नाईक, विनया जाधव पैठणीच्या मानकरी

राजापूर-मुमताज नाईक, विनया जाधव पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

rat5p12.jpg
60481
राजापूरः विजेत्यांसमवेत ए. डी. मालपेकर सन्स ज्वेलर्सचे आनंद मालपेकर, मेघना मालपेकर, प्रसन्न मालपेकर.
-------
मुमताज नाईक, विनया जाधव
पैठणीच्या मानकरी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः येथील सुवर्णकार आनंद मालपेकर यांच्या ए. डी. मालपेकर सन्स ज्वेलर्सच्या नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्ताने खरेदीवर आयोजित केलेल्या बक्षीस योजनेच्या सोडतीत मुमताज नाईक आणि विनया जाधव पैठणीच्या मानकरी ठरल्या.
ए. डी. मालपेकर सन्स ज्वेलर्सचे आनंद मालपेकर यांनी रॉयल प्लाझा येथे वातानुकूलित खरेदीचे नवे दालन सुरू केले आहे. या फर्मच्यावतीने नवरात्रीत, दसरा, दिवाळी सणाकरिता भव्य सूट आकर्षक योजना जाहीर केली होती. त्यामध्ये ५० हजार व त्यावरील खरेदीसाठी महिलांकरिता प्रथम बक्षिस पैठणी, द्वितीय बक्षिस सिल्क साडीया, तृतीय बक्षिस गृहापयोगी वस्तू अशी सहा बक्षिसे ठेवली होती. या योजनेचा लकी ड्रॉ ए. डी. मालपेकर सन्सच्या दालनात खरेदीदारांच्या उपस्थितीत नुकताच काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये शंभरहून अधिक खरेदीदारांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून सोडत पद्धतीने विजेते जाहीर करण्यात आले. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी विलास राजापकर, अंजली धागट ठरल्या तर, तृतीय क्रमांकाचा मान तुळाजी म्हादये आणि वंदना डोंगरकर यांनी पटकावला. विजेत्यांना मेघना मालपेकर व आनंद मालपेकर यांच्या हस्ते बक्षिसे सुपूर्द करण्यात आली.