प्रकाशाचा उत्सव पोस्ट कार्डच्या माध्यमातून उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाशाचा उत्सव पोस्ट कार्डच्या माध्यमातून उपक्रम
प्रकाशाचा उत्सव पोस्ट कार्डच्या माध्यमातून उपक्रम

प्रकाशाचा उत्सव पोस्ट कार्डच्या माध्यमातून उपक्रम

sakal_logo
By

(पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat५p९.jpg-
६०४७६

रत्नागिरी ः दामले विद्यालयातील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली दीपावली शुभेच्छा कार्ड.
------------
पोस्टकार्डच्या माध्यमातून प्रकाशाचा उत्सव

शिक्षिका सावंत ; दामले शाळेच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

रत्नागिरी, ता. ५ ः शहरातील दामले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डाच्या माध्यमातून प्रकाशाचा उत्सव सर्वांपर्यंत पोहोचवला. विद्यालयातील शिक्षिका अनुश्री आनंद सावंत यांनी तिसरीतील विद्यार्थ्यांकरिता हा अनोखा उपक्रम राबवला. यामध्ये ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकारची चित्रे साकारून ती रंगवून आणि दीपावलीचा संदेश देत प्रकाशाचा उत्सव साजरा केला.
पत्रलेखन ही एक कला आहे, ज्यात आपण आपल्या मनातील भावना शब्दाद्वारे व्यक्त करतो. कधी कधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचार आणि भावना व्यक्त करून शकत नाहीत तर त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो. शब्दांमध्ये व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. स्मार्टफोनच्या जमान्यात आजही काही ठिकाणी पत्र हे संपर्क करण्याचे साधन आहे. एक काळ असा होता की, लोक रात्र-दिवस पत्राची वाट पाहत असत; मात्र बदलत्या काळाबरोबर आणि तंत्रज्ञानांबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशी संपर्क साधता येतो. ९ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय टपाल दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र आजच्या पिढीला पत्र, पोस्टकार्ड याविषयी काही माहितीच नाही. या अनुषंगाने तिसरीच्या मुलांसाठी पत्र म्हणजे काय? त्याचा प्रवास कसा होतो? हे समजून देण्यासाठी शिक्षिका अनुश्री सावंत यांनी हा छोटासा उपक्रम घेतला. या उपक्रमात दिवाळी शुभेच्छा एकमेकांना पत्राद्वारे पाठवल्या. विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड पाहून खूप आनंद झाला. पत्र पाठवण्यासाठी मित्र-मैत्रिणीचा संपूर्ण पत्ता लिहिला. संपूर्ण पत्ता असल्याशिवाय पत्र जाऊ शकत नाही, ही गोष्ट विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिली. पोस्टकार्डवर विविध संदेश कल्पकतेने लिहिले.

रंगीत चित्रे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देताना शुभ दीपावली, आकाशकंदील, पानाफुलांची तोरणे, फुलपाखरू, विविध इमोजी, पणती, रॉकेट, पाऊस, भुईचक्र, चांदणी, फुलझाडे इत्यादी चित्र रंगसंगतीचा वापर करून चित्राचे रेखाटन केले. मोठ्या आकारात आकर्षक अक्षरलेखन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढली. शुभेच्छापत्र निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला. या उपक्रमाला पूरक उपक्रम म्हणून शिक्षिका अनुश्री सावंत यांनी आकाशकंदील बनवणे, मातीची पणती बनवणे इत्यादी उपक्रम घेतले.