डंपरमुळे शहरात अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरमुळे शहरात अपघात
डंपरमुळे शहरात अपघात

डंपरमुळे शहरात अपघात

sakal_logo
By

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat५p४.jpg ः
६०४४४
मंडणगड ः डंपरचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जमा झालेला जमाव.
-------------
डंपरमुळे शहरात अपघात; नागरिकांमध्ये असंतोष

मायनिंग वाहतुकीला विरोध ; डंपर अडवल्याने गोंधळ

मंडणगड, ता. ५ ः शहरात रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या डंपरचा हँडब्रेक न ओढल्याने झालेल्या अपघातामुळे शहरातील वातवरण गेले दोन दिवस चांगलेच ढवळून निघाले आहे. गेल्या आठवड्यात शहरातील मुख्य रस्तेमार्गाचा वापर करत तालुक्यात सुरू झालेल्या बॉक्साइट वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे हा अपघात झाल्याचा व वाहतुकीमळे विविध समस्या निर्माण झाल्याचा आरोप मायनिंग विरोधकांकडून केला गेला. त्यावर अपघात करणारा डंपर हा मायनिंगचा नसल्याचा खुलासा संबंधितांकडून करण्यात आला आहे.
मंडणगड शहरात ३ नोव्हेंबरला मुख्य रस्त्याला उभा केलेला डंपर हँडब्रेक न लावता उभा केल्याने झालेल्या अपघातात एक दुचाकी व रस्त्याशेजारी असलेल्या दुकानाची नासधूस झाली. सध्या बॉक्साईट वाहतूक सुरू असलेला रस्ता हा मुळात अरुंद व वजनदार वाहनांच्या वाहतुकीस योग्य नसल्याने बॉक्साईट वाहतूक सुरू होताच सर्वसामान्यांमधून या वाहतुकीबद्दल असंतोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील लाटवण ते चिंचघर या अंतरात दोन राज्यमार्ग व एक राष्ट्रीय महामार्गाचा या वाहतुकीसाठी सध्या वापर सुरू आहे. या रस्त्यांना अनेक वर्षात डागडुजीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग अनेक कारणांनी निधी मंजूर असूनही रखडलेला आहे. त्यामुळे नादुरुस्त रस्त्यांचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला बसला आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने त्याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. दरम्यान, शहरात झालेल्या अपघतानंतर घटनास्थळी जमा झालेल्या जमावाने बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या अडवल्या. घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या मंडणगड पोलिस ठाण्यात जमा केल्या. शुक्रवारीही (ता.४) समर्थनगर भिंगळोली येथे नागरिकांनी जमाव करून एक डंपर अडवला. बेकायदा व विनापरवाना नियमाबह्य वाहतूक करणाऱ्या डंपरवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस ठाण्याकडून मिळाले आहेत.
गुरुवारी शहरात झालेल्या अपघातानंतर शहारातील अनेक राजकारणी, माजी सभापती, माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्यने घटनास्थळी जमा झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी यावे लागले. काही काळाकरिता कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली होती. नुकसान झालेले व वाहतूकदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणवर तू तू मैं मैं झाली. या वेळी उपस्थितांमध्ये वाहतुकीचे समर्थन तसेच विरोध करणारे गट दिसून आले.