रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात देखावा पाहण्यासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात देखावा पाहण्यासाठी गर्दी
रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात देखावा पाहण्यासाठी गर्दी

रत्नागिरी- विठ्ठल मंदिरात देखावा पाहण्यासाठी गर्दी

sakal_logo
By

rat५p१४.jpg
L६०४९७
रत्नागिरीः येथील श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल, रुक्मिणीच्या मूर्तीवर अन्य देवतांची रूपे लावून सजावट केली जाते. श्री अंबाबाई, ज्योतिबा, हनुमान, लक्ष्मी, श्री दत्त, गणपती, भगवान शिवशंकर.
---------------
विठ्ठल मंदिरात देखावा पाहण्यासाठी गर्दी
आठपर्यंत पाहण्यासाठी खुली ; भाविकांकडून कौतुक
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरीतील सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या विठ्ठल मंदिरात प्रथेनुसार मूळ मूर्तींना अन्य देवतांची रूपे लावून आकर्षक देखावे साकारण्याची कला जपली जात आहे. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. दरवर्षी दीपावलीच्या सणानंतर देखावे बनवण्यास सुरवात होते. विठ्ठल मंदिरातील देखावे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत पाहायला मिळणार आहेत. कोकणात या परंपरेला मोठे महत्व असून रत्नागिरीसारख्या ठिकाणी कला अपवादानेच पाहायला मिळते.
पूर्वी शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर, श्री राम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पतितपावन मंदिरातही आकर्षक देखावे होत असत; परंतु अलीकडे फक्त विठ्ठल मंदिरातच हा सोहळा पाहण्याची पर्वणी आहे. सध्या या मंदिरात पराग तोडणकर, मनेश शिंदे, पराग हेळेकर, सुनील सावंत, अभिषेक पवार, सुमुख कीर, मनोज फणसोपकर हे देखावे बनवत आहेत. लक्ष्मी, कृष्ण-सुदामा, साईबाबा, विठ्ठल रखुमाई, दत्त, ग्रामदैवत भैरी बुवा, श्री स्वामी समर्थ, संत तुकाराम आदींची रूपे या मंदिरात आतापर्यंत करण्यात आली आहेत.
कोकणात शिमगोत्सवामध्ये सर्व ग्रामदैवतांना रूपं लावली जातात. ही रूपं त्याच देवतांची असतात; पण दिवाळीमध्ये रत्नागिरीतल्या मूर्तींना दुसर्‍या देवतांचे रूप देण्याची प्रथा आहे. ही रूपं इतकी सुरेख व चपखल असतात की, आपण नक्की कोणत्या मंदिरात आलो आहोत असा प्रश्‍न भाविकांना पडू शकतो. विठ्ठल मंदिरात शुक्रवारपासून कार्तिकी एकादशीचा महोत्सव सुरू आहे. या निमित्त झालेल्या जत्रेमध्ये हजारो भाविकांनी दर्शन घेतले. उत्सवकाळात मंदिरात सकाळी काकड आरती केली जाते. त्यानंतर दुपारी विविध देवदेवतांच्या स्वरूपातील रूपे मंदिरातील मूळ मूर्तींना देण्यास सुरवात होते. रात्री ११.३० पर्यंत ही रूपे पाहण्यासाठी खुली असतात.