शंभर टक्‍के वसुली झालेल्‍या संस्थांचा कणकवलीत गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर टक्‍के वसुली झालेल्‍या 
संस्थांचा कणकवलीत गौरव
शंभर टक्‍के वसुली झालेल्‍या संस्थांचा कणकवलीत गौरव

शंभर टक्‍के वसुली झालेल्‍या संस्थांचा कणकवलीत गौरव

sakal_logo
By

60534
कणकवली : असलदे विकास सोसायटी चेअरमन भगवान लोके व संचालक मंडळाचा सन्मान करताना आमदार नीतेश राणे.


शंभर टक्‍के वसुली झालेल्‍या
संस्थांचा कणकवलीत गौरव

आमदार नीतेश राणेंच्या हस्ते गौरव

कणकवली, ता.५ : जून अखेरपर्यंत कर्जाची शंभर टक्‍के वसुली केलेल्‍या विकास संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्‍कार आज कणकवलीत झाला. सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेतर्फे भगवती मंगल कार्यालयात झालेल्‍या या कार्यक्रमात तालुक्‍यातील ३८ संस्थांचा गौरव आमदार नीतेश राणे यांनी केला. यावेळी त्‍यांनी जिल्‍हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्‍न करू, अशी ग्‍वाही दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ३० जून अखेरपर्यंत बॅक कर्जाची शंभर टक्‍के वसुली केल्याबद्दल तालुक्यातील फोंडाघाट, नाटळ, तळेरे, कलमठ, शिवडाव, रामेश्वर विकास संस्था असलदे, आयनल, कोळोशी आदी विकास संस्थाचा गौरव आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींच्या हस्ते झाला. यावेळी बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, तुळशीदास रावराणे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, संतोष कानडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते.