शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन
शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन

शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन

sakal_logo
By

(पान २ साठी)

शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन

दाभोळ, ता. ५ ः दापोलीतील नवभारत छात्रालयाची धुरा ६० समर्थपणे वाहणारे (कै.) पांडुरंग शिंदे गुरूजी यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी गुरुजींच्या नावे सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार २०१०-११ पासून सुरू करण्यात आला आहे. हा सोहळा जानेवारी २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यात (कै.) पांडुरंग गणपत शिंदे गुरूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाभावनेने कार्य करणारे प्राथमिक शिक्षक (ग्रामीण व शहरी विभाग), माध्यमिक शिक्षक, शेतकरी, कृषी विस्तार कार्यकर्ता व कृषि उद्योजक यांना देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम रु. ५ हजार रूपये असे आहे. इच्छुक उमेदवारांनी या पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत, असे आवाहन कुणबी सेवा संघ दापोली यांच्याकडून करण्यात येत आहे.
इतर व्यक्ती किंवा संस्थादेखील या पुरस्कारांसाठी योग्य उमेदवाराची शिफारस करू शकतात. उमेदवारांनी स्वतःची किंवा पुरस्कर्त्यांनी उमेदवारांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यामध्ये समन्वयक, सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार समिती, द्वारा नवभारत छात्रालय, शिवाजीनगर, दापोली, जि. रत्नागिरी यांच्याकडे २० नोव्हेंबरला पर्यंत पाठवावी. याबाबत अधिक माहितीसाठी हरिश्‍चंद्र कोकमकर, समन्वयक सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरूजी स्मृती पुरस्कार समिती यांच्याशी संपर्क साधावा.