संगीत महोत्सवात सखी पावशी, केपादेवी विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगीत महोत्सवात सखी पावशी, केपादेवी विजेते
संगीत महोत्सवात सखी पावशी, केपादेवी विजेते

संगीत महोत्सवात सखी पावशी, केपादेवी विजेते

sakal_logo
By

60537
अणसूर ः येथील वारकरी भजन स्पर्धेतील विजेत्या केपादेवी मंडळाचा सन्मान करताना नाथा गावडे. शेजारी सत्यविजय गावडे, संजय गावडे व इतर.

संगीत महोत्सवात `सखी पावशी’, ‘केपादेवी’ विजेते

वेंगुर्लेत आयोजन ः फुगडी, वारकरी भजन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः तालुक्यातील अणसूर येथील श्री देवी सातेरी कला, क्रीडा मंडळ, अणसूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय भव्य संगीत महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी घेण्यात आलेल्या खुल्या फुगडी स्पर्धेत सखी फुगडी संघ पावशी यांनी, तर वारकरी भजन स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ मूठ-वेंगुर्ले यांनी विजेतेपद पटकावले.
संगीत महोत्सवाचे उद्घाटन २८ ऑक्टोबरला मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक रंगनाथ उर्फ नाथा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपी गावडे, चंद्रकांत गावडे, सरपंच अन्विता गावडे, उपसरपंच संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय गावडे, गणेश गावडे, विजय सरमळकर, वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर, पांडू गावडे, चंदू गावडे, नारायण ताम्हणकर, मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसूरकर, उपाध्यक्ष सुनील गावडे, खजिनदार सिद्धेश गावडे, नारायण गावडे, महादेव गावडे, बिटू गावडे, कौस्तुभ गडकर, विजय गावडे यांच्यासहि मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उदघाटन समारंभानंतर कोल्हापूर नृसिंहवाडी येथील ह.भ.प. शरद बुवा घाग यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
२९ ला ऑक्टोबर घेण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेत सिंधुदुर्ग व गोवा येथील नामांकित नऊ संघांनी सहभाग घेतला. यात सखी फुगडी संघ पावशी यांनी प्रथम, श्री भैरव जोगेश्वरी कुडाळ यांनी द्वितीय, ओंकार सिद्धेश्वर उभादंडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री सातेरी फुगडी ग्रुप पेडणे गोवा, उत्कृष्ट गायक-कोरस म्हणून तारदेवी केळुस, तर उत्तेजनार्थ श्री देव वाटेराम महापुरुष पालये-गोवा यांना गौरविण्यात आले. ३० ला घेण्यात आलेल्या वारकरी भजन स्पर्धेत नामांकित नऊ मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत श्री केपादेवी मंडळ मूठ-वेंगुर्ले यांनी प्रथम, महापुरुष निवती यांनी द्वितीय, तर दत्तप्रसाद मंडळ डिचोलकरवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री देव वेतोबा कोचरा, उत्कृष्ट पखवाजवादक प्रवीण डिचोलकर (दत्तप्रसाद मंडळ), उत्कृष्ट गायक गणंजय सावंत (श्री केपादेवी), तर उत्तेजनार्थ अचानक वारकरी भजन मंडळ वेंगुर्ले यांना गौरविले. दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संगीत महोत्सवाचे औचित्य साधून प्रसिद्ध भजनी कलाकार दीप्तेश मेस्त्री व तेजस मेस्त्री तसेच पश्चिम बंगाल येथे झालेल्या ३१ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप (रायफल) स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के करणाऱ्या वेंगुर्लेची कन्या सानिया आंगचेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊ मालवणकर, उदय मालवणकर यांनी ठेवलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजा सामंत व गजमुख गावडे यांनी सूत्रसंचालन केले.