रेडीत ३७ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडीत ३७ जणांचे रक्तदान
रेडीत ३७ जणांचे रक्तदान

रेडीत ३७ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

रेडीत ३७ जणांचे रक्तदान
वेंगुर्ले ः (कै.) चंद्रकांत उर्फ नीलेश राऊळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र, रेडी येथे प्रीतेश राऊळ मित्रमंडळातर्फे आयोजित १४ व्या रक्तदान शिबिरात ३७ दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य मंगेश कामत, चित्रा कनयाळकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, रेडी उपसरपंच नामदेव राणे, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, समीर कांबळी, डॉ. अनू शर्मा, वसंत तांडेल, सुनील सातजी, प्रभाकर राऊळ, संजू कांबळी, आनंद भिसे, गायत्री सातोस्कर, श्रीकांत राऊळ, नीलेश रेडकर, फ्रान्सिस सोज, अरुण राणे, संदीप धानजी, ज्ञानेश्वर केरकर, ओमकार कोणाडकर, उल्हास नरसुले, डॉ. येडवे, प्राजक्ता रेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन पुरुषोत्तम राणे यांनी, आभार प्रीतेश राऊळ यांनी मानले.
--
पोषण आहार योजनेच्या नावात बदल
कणकवली ः प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्यादृष्टीने तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि विद्यार्थी गळती थांबविण्यासाठी केंद्राने शालेय पोषण आहार सुरू केला. ही योजना आता ‘शालेय पोषण आहार योजना’ या नावाने ओळखली जाणार नाही. कारण केंद्राने या योजनेचे नामकरण केले असून त्यानुसार आता ही योजना ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण)’ म्हणून ओळखण्यात येणार आहे.
-----------
तेंडोलीत सोमवारी जत्रोत्सव
कुडाळ ः तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी (ता.७) त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, सायंकाळी पालखी सजविणे, रात्री आठला देवस्वारीचे सातेरी मंदिरात आगमन, साडेआठला ‘टिपर पाजळणे’, दहाला पालखी सोहळा, अकराला मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक, ८ ला सकाळी दहिकाला, ९.३० वाजता देव मांडावर येणे, देवाचा कौल घेणे व नंतर देवाचे रवळनाथ मंदिरात प्रस्थान असे कार्यक्रम होणार आहेत.