भाजपकडून पालकमंत्री सामंत यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपकडून पालकमंत्री सामंत यांचे स्वागत
भाजपकडून पालकमंत्री सामंत यांचे स्वागत

भाजपकडून पालकमंत्री सामंत यांचे स्वागत

sakal_logo
By

( पान ३)

- rat५p२०.jpg-

६०५१४

रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद येथे भाजप कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करण्यात आले.

वाटद जिल्हा परिषद गटात भाजपकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वागत

रत्नागिरी, ता. ५ ः तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. राज्यात असलेल्या युतीप्रमाणे स्थानिक पातळीवरदेखील वाटद गटात सहकार्य राहील, अशी प्राथमिक चर्चा या वेळी करण्यात आली.
या दौऱ्यावेळी नांदिवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक सुर्वे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत शुक्रवारपासून रत्नागिरी दौऱ्‍यावर आहेत. शुक्रवारी जनता दरबार झाल्यानंतर शनिवारी सकाळी सामंत यांच्या वाटद जिल्हा परिषदेचा दौरा सुरू झाला. शनिवारी सकाळी सामंत खंडाळा येथे दाखल झाले. वाटद जिल्हा परिषदेच्या दौऱ्‍यावर आलेल्या सामंत यांचे भाजपच्या स्थानिक पदाधिकऱ्‍यांनी जंगी स्वागत केले. या वेळी वरवडे, वाटद, चाफेरी, नांदिवडे, सत्कोंडी, लावगण आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नांदिवडे ग्रामपंचायत उपसरपंच विवेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सामंत यांचे स्वागत केले. वाटद दौऱ्‍यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सामंत यांच्या या दौऱ्‍यात भाजप पदाधिकारीदेखील सहभागी झाले. राज्यात असलेल्या युतीप्रमाणे स्थानिक पातळीवरदेखील वाटद जिल्हा परिषद गटात सहकार्य राहील, अशी प्राथमिक चर्चा या वेळी करण्यात आली.